Tue, Dec 23, 2025

शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकरांचं निधन; विदर्भात शिवसेनेसाठी उल्लेखनीय काम

Written by:Rohit Shinde
Published:
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना जरी वेग आला असला तरी शिवसेनेतून मात्र एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे तरुण, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे.
शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकरांचं निधन; विदर्भात शिवसेनेसाठी उल्लेखनीय काम

एकसंघ शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यावर गेल्या एक महिन्यांपासून मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली होती. वणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विश्वास नांदेकरांच्या निधनाने हळहळ

शिवसेनेतून मात्र एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे तरुण, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात ते उपचार घेत होते आणि उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच यवतमाळ जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विश्वास नांदेकर यांच्यावर गेल्या महिनाभरापासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी अतोनात प्रयत्न सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ डिसेंबर रोजी रुग्णालयात जाऊन विश्वास नांदेकर यांची भेट देखील घेतली होती. त्या वेळी त्यांनी नांदेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांकडून त्यांच्या उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली होती. त्या भेटीदरम्यान नांदेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील दिसून येत होते.

विदर्भात नांदेकरांचे उल्लेखनीय कार्य

यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे विश्वास नांदेकर यांनी केले होते. शिवसेनेतून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली होती. तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा कठीण प्रवास हा कायम प्रेरणादायी ठरला. आक्रमक शिवसैनिक म्हणून देखील त्यांची ओळख होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा क्षेत्राच्या समन्वयकपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती. मात्र त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची तब्येत अधिकच बिघडत गेली आणि प्रकृती जास्तच खालावली. अखेर उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.