आज १९ डिसेंबर. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या राजकारणाचे लक्ष आज अमेरिकेकडे लागले आहे. कुख्यात उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे ‘एपस्टीन फाईल्स’ आज अमेरिकेच्या संसदेत खुली होणार आहेत. या खुलाशांमधून समोर येणारी माहिती जगाला हादरवणारी असेल आणि भारताच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. आज १९ डिसेंबर रोजी देशाच्या राजकारणात एखादी मोठी उलथापालथ होणार का? अशी चर्चा आता देशभरात रंगली आहे. या फाईल्समधील अनेक धक्कादायक खुलासे होण्यास सुरूवात देखील झाली आहे.
एपस्टीन फाईल्समधील ‘ते’ 68 फोटो जगासमोर
जेफ्री एपस्टाईनच्या इस्टेटमधून जप्त केलेले 68 नवीन फोटो शेअर करण्यात आल्याने जगात एकच खळबळ उडाली आहे. या नवीन 68 फोटोसमध्ये असंख्य सेलिब्रिटींचे खाजगी फोटो शेअर करण्यात आले आहे. हे फोटो एपस्टाईनच्या मृत्यूपूर्वी जप्त केलेल्या 95,000 फोटोंतून मिळवले गेले आहेत. एपस्टाईनचा 2019 मध्ये तुरुंगात मृत्यू झाला. नवीन शेअर करण्यात आलेल्या 68 फोटोमधील काही फोटोमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स चित्रपट निर्माते वुडी अॅलन, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन, चित्रपट दिग्दर्शक नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह अनेक व्यक्तींसोबत दिसत आहेत.
दोन फोटोंमध्ये बिल गेट्स महिलांसोबत दिसत आहेत. न्यू यॉर्क टाइम्सच्या एका स्तंभलेखकाचा फोटोही समोर आला आहे. एवढेच नाही तर न्यू यॉर्क टाइम्सचे स्तंभलेखक डेव्हिड ब्रूक्सचा फोटोही समोर आला आहे. न्यू यॉर्क टाईम्सने या फोटोबाबत एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की ब्रूक्स 2011 मध्ये एका डिनर पार्टीला उपस्थित होते. ही माहिती त्यांच्या कॉलममध्ये देखील समाविष्ट आहे.
जेफ्री एपस्टीन नेमका कोण; प्रकरण काय ?
जेफ्री एपस्टाईन हा एक अमेरिकन फायनान्सर होता जो नंतर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि लैंगिक तस्करीचे संघटित नेटवर्क चालवणारा माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला. एपस्टाईनचा जन्म 20 जानेवारी 1953 रोजी न्यू यॉर्कमध्ये झाला. त्याने शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली परंतु लवकरच तो वित्त क्षेत्रात प्रवेश केला. मर्यादित औपचारिक पात्रता असूनही, त्याने अब्जाधीश आणि प्रभावशाली लोकांमध्ये स्वतःची स्थापना केली. त्याच्या संपत्तीचे आणि व्यावसायिक क्रियाकलापांचे खरे स्वरूप बराच काळ अस्पष्ट राहिले.
एपस्टाईनचे संबंध असंख्य प्रमुख उद्योगपती, राजकारणी आणि जागतिक व्यक्तींशी असल्याचे वृत्त आहे. खाजगी बेटे, लक्झरी जेट आणि भव्य मालमत्ता त्याच्या जीवनशैलीचा भाग होत्या, ज्यांचा वापर पीडितांना आकर्षित करण्यासाठी आणि गुन्हे लपविण्यासाठी केला जात असे. 10 ऑगस्ट 2019 रोजी, एपस्टाईनचा तुरुंगात मृत्यू झाला. अधिकृतपणे, तो आत्महत्या असल्याचे घोषित करण्यात आले, परंतु सुरक्षेतील त्रुटी आणि परिस्थितीमुळे गैरप्रकार झाल्याचा संशय निर्माण झाला. त्याच्या मृत्यूमुळे अनेक नावे, संबंध आणि सत्य न्यायालयात पोहोचण्यापूर्वीच उघड झाले.
एपस्टीन फाईल्स नेमका काय विषय ?
अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याने जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, ई-मेल्स, फोटो आणि संपर्कांची माहिती ‘Epstein Files Transparency Act’ अंतर्गत सार्वजनिक केली जाणार आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाला ही कागदपत्रे उघड करण्यासाठी 19 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली होती.
अमेरिकन डेमोक्रॅट्सने हे स्पष्ट केले आहे की या फोटोवरून या व्यक्तींनी काही चुकीचं काम केल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाही. समितीनुसार, या फोटोतून एपस्टीनचे सामाजिक आणि राजकीय वर्तुळ स्पष्ट होते. पण यातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या गुन्ह्यात सहभागी असतील असं म्हणता येत नाही. पण हे फोटो त्याचे वलय मात्र दाखवतात.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर ही फोटो आणि इतर कागदपत्रं ज्याला एपस्टीन फाईल्स असं म्हणतात ती सार्वजनिक करण्याचा मार्ग मोकळा झाला. आज यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. अमेरिकाच नाही तर जगभरात या एपस्टीन फाईल्सची चर्चा आणि उत्सुकता लागलेली आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी या विधेयकाला त्यांनी मंजुरी दिली होती. तर येत्या 30 दिवसात छायाचित्र आणि फाईल्स सार्वजनिक करण्याची सक्ती होती. त्यामुळे आज या प्रकरणात मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.
भारताच्या राजकारणावर काय परिणाम होणार ?
पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दावा केला आहे की, एपस्टीन फाईल्समध्ये भारतातील काही आजी-माजी खासदारांची नावे आहेत. या खुलाशांमुळे देशाचा पंतप्रधान बदलू शकतो आणि नागपूरशी संबंधित व्यक्ती पंतप्रधानपदावर बसेल, असा तर्क त्यांनी मांडला आहे. याआधीही त्यांनी असा दावा केल्याने मोठी चर्चा झाली होती आणि ते आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही टीका करत ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
NEW: House Oversight Democrats released new photos from Jeffrey Epstein’s estate.
The images include a Ukrainian passport, Bill Gates posing with a woman whose face was redacted, a screenshot of texts discussing the sending of girls, and a photo of a foot bearing a quote from… pic.twitter.com/qEjihf7eef
— Clash Report (@clashreport) December 18, 2025





