बिटकॉईन पहिल्यांदाच 1.08 कोटींच्या पार, 2009 साली एका बिटकॉईनची किंमत शून्यावर होती, एका वर्षात 57 लाख रुपयांनी वाढले

Written by:Smita Gangurde
Published:
जगातील आर्थिक, राजकीय आणि नियमांतील बदलांमुळे बिटकॉईनची रक्कम एवढ्या उंचीवर पोहचली आहे. मात्र तरीही बिटकॉईन्सबाबात अद्यापही साशंकता व्यक्त करण्यात येते.
बिटकॉईन पहिल्यांदाच 1.08 कोटींच्या पार, 2009 साली एका बिटकॉईनची किंमत शून्यावर होती, एका वर्षात 57 लाख रुपयांनी वाढले

मुंबई – बिटकॉईनची किंमत पहिल्यांदा 1.08 कोटींवर पोहचलीय. आत्तापर्यंतच्या क्रिप्टो करन्सीच्या व्यवाहारातील हा सर्वात मोठा आकडा आहे. 2009 साली सतोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीनं पहिल्यांदा बिटकॉईनची निर्मिती केली होती. त्यावेळी त्याचं मूल्य 00 रुपये होतं. म्हणजे त्यावेळी जर एखाद्या व्यक्तीनं त्यात एक रुपयापेक्षाही कमी गुंतवणूक केली असती तर त्याची किंमत आज 1 कोटी रुपये झाली असती.

बिटकॉईनच्या किमंतीत पहिल्यांदा मोठी वाढ ऑक्टोबर 2010 मध्ये झाली होती. त्यावेळी एक बिटकॉईनची किंमत दीर्घ काळासाठी 0.10 डॉलरपर्यंत स्थिर राहिल्यानंतर वाढू लागली होती. वर्षाखेरीपर्यंत ही किंमत 0.30 डॉलरपर्यंत पोहचली होती. तर 2013 साली त्याची किंमत वाढून 1000 डॉलर्सपर्यंत पोहचली. आजच्या बाजारभावानुसार बिटकॉईन त्यावेळी 87 हजार रुपयांच्या जवळ होता.

बिटकॉईन इतक्या मोठ्या उंचीवर का पोहचला?

जगातील आर्थिक, राजकीय आणि नियमांतील बदलांमुळे बिटकॉईनची रक्कम एवढ्या उंचीवर पोहचली आहे.
१. अमेरिकेतील धोरणातील बदल – राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टो अनुकल धोरणं लागू केली आहे, बँकांना क्रिप्टो कंपन्यांसोबत काम करण्यावरील बंदी हटवण्यात आलीय.

२. मोठ्या संस्थांची गुंतवणूक – मोठ्या संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी बिटकॉईनमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे बिटकॉईनच्या मागणीत वाढ झाली आहे.

३. क्रिप्टो मार्केटबाबत वाढती स्वीकारहार्तता- लंडन आणि थाडलंड सारख्या देशांतील अर्थव्यवस्थेत क्रिप्टोला मान्यता मिळाल्यानं स्कीराहर्तता वाढली आहे.

बिटकॉईन म्हणजे काय आणि काय कार्यपद्धती?

बिटकॉईनला डिजिटल जगातील सोनं म्हणून संबोधलं जातं. हे असं एक डिजिटल चलन आहे, जे कोणत्याही बँकेच्या किंवा सरकारच्या नियंत्रणाशिवाय काम करतं. याचा अर्थ हे चलन विक्रेंद्रीत आहे, कोणत्याही एका व्यक्ती, संस्था, बँक किंवा देशाचं यावर नियंत्रण नाही.

बिटकॉईन म्हणजे प्रत्यक्षात कोणतीही नोट किंवा चलन नाही, तर एक डिजिटल कोड आहे, जो तुमच्या डिजिटल वॅलेटमध्ये राहतो. व्हॉट्सअप मेसेजप्रमाणे तुम्ही बिटकॉईन इंटरनेटच्या माध्यमातून जगात कुठेही पाठवू शकता. त्यांची संख्या मर्यादित आहे.

बिटकॉईन ब्लॉकचेनच्या रचनेवर काम करतं

१. कल्पना करा ही एक वहीखातं आहे, त्यात जगभरातील बिटकॉईनची देवाणघेवाण करण्यात येते. या वहीखात्यालाच ब्लॉकचेन असं म्हटलं जातं. जगातील हजारो कॉम्प्युटरवर एकावेळी ब्लॉकचेन अस्तित्वात असतं.

२. ब्लॉकचेनमध्ये देवाणघेवाण, व्यवहाराचा रेकॉर्ड ठएवण्यात येतो. यातील माहिती प्रत्येकजण पाहू शकतो. मात्र त्यात बदल किंवा काढून टाकण्याचा पर्याय नसतो.

३. जेव्हा तुम्ही कुणालाही बिटकॉईन पाठवला तक हा व्यवहार ब्लॉकचेनमध्ये नोंदला जातो. हे तपासण्याचं आणि सुरक्षित करण्याचं काम मायनर्स करत असतात. संगणकाच्या सहाय्यानं मायनर्स समस्यांचं निराकरण करतात. या बदल्यात त्यांना नवे बिटकॉईन मिळत राहतात.

४. या व्यवस्थेवर कुणाचंही नियंत्रण नसल्यामुळे, बँका बुडाल्या तरी या ठिकाणी पैसे सुरक्षित राहतात असं मानण्यात येतं. ब्लॉकचेनमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता या दोन्हींचा विचार करण्यात येतो.