तुषार कपूरच्या प्रॉपर्टी डीलची तुफान चर्चा! 559 कोटींमध्ये मुंबईतील कमर्शियल बिल्डिंग जपानी कंपनीला विकली

Published:
या व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारले गेले नाही. रिअल इस्टेट सल्लागार स्क्वेअर यार्ड्सच्या मते, २०२४ च्या सरकारी ठरावानुसार अशा व्यवहारांना मुद्रांक शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
तुषार कपूरच्या प्रॉपर्टी डीलची तुफान चर्चा! 559 कोटींमध्ये मुंबईतील कमर्शियल बिल्डिंग जपानी कंपनीला विकली

बॉलिवूड आणि रिअल इस्टेट जगत पुन्हा एकदा चर्चेत आहे. अभिनेता तुषार कपूरने मुंबईच्या उपनगरातील एक मोठी व्यावसायिक मालमत्ता जपानी दिग्गज एनटीटी ग्रुपच्या भारतीय युनिटला विकली आहे. अंदाजे ₹५५९ कोटी किमतीच्या या उच्च मूल्याच्या करारामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नोंदणी कागदपत्रांनुसार, हा व्यवहार NTT ग्लोबल डेटा सेंटर्स आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये झाला आहे. तुषार कपूर यांच्या या कंपनीत त्यांच्या वडिलांचे आणि दिग्गज अभिनेता जितेन्द्र यांच्या कंपनी पँथियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडचीही भागीदारी आहे. ही मालमत्ता मुंबईच्या चांदिवली भागातील बालाजी आयटी पार्कमध्ये स्थित आहे आणि तिची नोंदणी ९ जानेवारी रोजी पूर्ण झाली.

या डीलअंतर्गत जपानी कंपनीने सुमारे 30,195 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली एक विशाल व्यावसायिक जागा खरेदी केली आहे. यात ग्राउंड प्लस 10 मजली DC-10 बिल्डिंग, ज्यामध्ये डेटा सेंटर चालवला जातो, तसेच एक वेगळी चार मजली डिझेल जनरेटर स्ट्रक्चरही समाविष्ट आहे. ही मालमत्ता सध्या डेटा सेंटरसारख्या उच्च मागणी असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर श्रेणीत येते, ज्यामुळे तिची किंमत आणखी वाढते.

मुद्रांक शुल्कात सवलत

विशेष म्हणजे, या व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारले गेले नाही. रिअल इस्टेट सल्लागार स्क्वेअर यार्ड्सच्या मते, २०२४ च्या सरकारी ठरावानुसार अशा व्यवहारांना मुद्रांक शुल्कातून सूट देण्यात आली आहे. तथापि, या व्यवहारावर ₹५.५९ लाखांचा मेट्रो सेस भरण्यात आला.

याआधी एक मोठा करार

रिअल इस्टेट मार्केटमध्ये हा करार महत्त्वाचा मानला जातो कारण मे २०२५ मध्ये याच क्षेत्रात ८५५ कोटी रुपयांचा मोठा करार झाला होता, जो मुंबईतील व्यावसायिक मालमत्तांच्या वाढत्या मागणीचे प्रतिबिंब आहे.