अर्थसंकल्प सादर होताच सिगारेट महागली, 10 रुपयांच्या सिगारेटचा पॅक आता कितीला मिळणार?

Published:
सिगारेटच्या लांबीच्या आधारावर करवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लांब किंवा प्रीमियम सिगारेटवर याचा अधिक परिणाम झाला आहे. 65–70 मिमी लांबीच्या सिगारेटवर आता प्रति स्टिक सुमारे ₹3.6 ते ₹4 इतकी अतिरिक्त ड्युटी लागणार आहे. तर 70–75 मिमी सिगारेट प्रति स्टिक सुमारे ₹5.4 ने महाग झाली आहे.
अर्थसंकल्प सादर होताच सिगारेट महागली, 10 रुपयांच्या सिगारेटचा पॅक आता कितीला मिळणार?

युनियन बजेट 2026-27 सादर होताच सरकारने तंबाखू वापरणाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांवर नवीन कररचना जाहीर केली आहे. ही नवी कररचना 1 फेब्रुवारीपासून तात्काळ लागू करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम असा झाला आहे की सर्व श्रेणीतील सिगारेटच्या किमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे.