MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर; तुमच्या शहरात आज काय भाव ?

Written by:Rohit Shinde
Published:
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6.00 वाजता नव्याने जाहीर होत असतात. देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सध्या कमालीची स्थिरता पाहायला मिळत आहे. आजचे दर जाणून घेऊ...
Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर; तुमच्या शहरात आज काय भाव ?

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर कंपन्यांनी सकाळी 6 वाजता जाहीर केले आहेत.पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये देशभरात अगदी किंचित बदल बघायला मिळत आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रती लिटर 94.77 रूपये तर डिझेल प्रती लिटर 87.67 रूपये आहे. त्या तुलनेने राज्यातील मुंबई, पुणे आणि अन्य महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेल महागल्याचे चित्र आहे. कारण, मुंबईत पेट्रोल 103.50 रूपये प्रति लिटर तर डिझेल 90.03 रूपये दराने मिळत आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल काहीस स्वस्त झाल्याचं चित्र आहे.

पुणे, नागपुरात काय स्थिती?

राजधानी दिल्ली, मुंबई या शहरांशी तुलना करता सध्या पुण्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर चांगलेच वाढले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 104.88 रूपये तर डिझेल 91.37 रूपये प्रति लिटर या दराने विकले जात आहे. त्यामुळे पुणेकरांना पेट्रोल डिझेलसाठी राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. तरी गेल्या काही दिवसांत दर खाली आल्याचं चित्र आहे. उत्तर भारतातील बहुतांश शहरांत पुण्या सारखीच परिस्थिती आहे. नागपुरात पेट्रोल 104.32 तर डिझेल 90.55 रूपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

देशभरातील प्रमुख शहरांत काय दर ?

कोलकाता – पेट्रोल: 105.41 डिझेल: 92.02

चेन्नई –  पेट्रोल: 100.80 डिझेल: 92.39

बंगळूरू- पेट्रोल: 102.98 डिझेल: 91.04

हैदराबाद- पेट्रोल: 107.46 डिझेल: 95.70

चंदीगढ – पेट्रोल: 94.30  डिझेल: 82.45

पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते.

तेल विपणन कंपन्या (OMCs) दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारतात, जे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि चलन विनिमय दरांमधील चढउतार प्रतिबिंबित करतात. हे नियमित अपडेट पारदर्शकता सुनिश्चित करतात आणि ग्राहकांना सर्वात अचूक आणि अद्ययावत इंधन किमतीची माहिती प्रदान करतात.

आजच्या तारखेला सीएनजी पुणे शहरात 92 रूपये किलो नुसार विकला जातोय, तर दिल्लीत सीएनजीचे दर 76.09 रूपये प्रतिकिलो असा आहे. चेन्नई, बंगळूरूमध्ये अनुक्रमे 91.5 , 89 असा दर पाहायला मिळत आहे.

टीप; पेट्रोल – डिझेल आणि इतर इंधनांच्या दरात शहरांनुसार बदल होत असतो. अधिक माहितीसाठी तुमच्या नजीकच्या पेट्रोल पंपावरील दर तपासा.