GOLD SILVER RATE: सोने – चांदीचे आजचे ताजे बाजारभाव समोर, खरेदी करताना जाणून घ्या दर

Written by:Rohit Shinde
Published:
सोने आणि चांदीचे आजचे ताजे बाजारभाव समोर आले आहेत, तुमच्या शहरात नेमका काय दर, जाणून घेऊया सविस्तर...
GOLD SILVER RATE: सोने – चांदीचे आजचे ताजे बाजारभाव समोर, खरेदी करताना जाणून घ्या दर

GOLD SILVER RATE 19th APRIL 2025: एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून सोने- चांदीच्या दरात चांगलीच हालचाल पाहायला मिळत आहे. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर हे दर पुन्हा वाढताना दिसत आहेत. देशातील बहुतांश भागात आज सोने प्रतितोळा (10 ग्रॅम) 97 हजार तर चांदी किलोमागे 1 लाख रूपयांच्या आसपास असल्याचं चित्र आहे. सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, कोसळणारे दर गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढत आहेत. आज दर काही प्रमाणात स्थिर असल्याचे चित्र आहे.

सराफा बाजारातून आज सोने चांदीच्या दरांबाबत जी अपडेट समोर आलीयं, त्यानूसूरा (Gold Silver Price Today)  14 एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate Today) 89,600 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत  97, 730 रूपये 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत  73,310 रुपये इतकी आहे. तर 1 किलो चांदीची किंमत देशातील बहुंताश प्रमुख शहरात 99,900 ;च्या आसपास आहे.

जाणून घ्या आजचे दर

18 कॅरेट सोन्याचे आजचे दर

दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Rate Today) 73,310/- रूपये इतकी आहे.
कोलकाता आणि मुंबई सराफा बाजारात दर 73, 190/- रूपये आहे.
इंदौर आणि भोपालमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर  73, 230 आहे.
चेन्नईच्या सराफा बाजारात 74, 050/- रूपयांवर दर पोहोचला आहे.

22 कॅरेट सोन्याचे आजचे दर

भोपाल, इंदौर, पुणे या शहरांत (Gold Rate Today) 89, 500/- इतका 22 कॅरेटचा दर आहे.
जयपुर, लखनऊ, दिल्लीच्या सराफा बाजारात आज 10 ग्रॅमची किंमत 89, 600/- इतकी आहे.
मुंबई, हैदराबाद, केरळच्या सराफा बाजारांमध्ये हा दर 89, 450/-  वर पोहोचलाय.

24 कॅरेट सोन्याचा दर

भोपाळ, इंदौर, पुणे आदी शहरांत 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97, 360 इतकी आहे.
दिल्ली, लखनऊ, चंदीगढच्या बाजारात आज 10 ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत 97,460/-  रूपये इतकी आहे.
हैदराबाद, केरळ, बंगळूरू, मुंबई त्या सराफा मार्केटमध्ये 97,310/-  इतका दर आहे.
चैन्नईच्या सराफा बाजारामध्ये 97,310/-  इतका दर आहे.

चांदीचे दर

जयपूर, कोलकाता, अहमदाबादच्या मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत 99, 900 /- आहे.
दक्षिण भारतातील चैन्नई, मदुराई, हैदराबादच्या सराफा बाजारांत  1,09,900/- रुपये दर आहे.
भोपाळ, इंदौरमध्ये एक किलो चांदीची किंमत 1,00,000/- आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

ISO (Indian Standard Organization) द्वारे सोन्याची शुद्धता समजण्यासाठी हॉलमार्क दिले जातात.
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असते, तर 22 कॅरेट सोने 91 टक्के शुद्ध असते.
24 कॅरेट सोन्यामध्ये 1.O (24/24 = 1.00) एवढी शुद्धता असावी लागते.
22 कॅरेट सोन्यामध्ये 9 टक्के इतर धातू वापरले जातात,  तांबे, चांदी, झिंक याचा वापर केला जातो.
22 कॅरेट सोने 0.916 (22/24 = 0.916) इतके शुद्ध असावे लागते.
24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 999 तर  23 कॅरेटच्या दागिन्यावर 958, 22 कॅरेटवर 916 असे लिहिले जाते. 21 कॅरेटवर 875 तर 18 कॅरेटवर 750 लिहिले जाते.
24 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये कोणतेही धातू मिसळले जात नाहीत. याचे बिस्कीटं तसेच सोन्याची नाणी मिळतात. परंतु 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दागिने बनविले जाणे अवघड आहे…परिणामी दुकानदार 22, 20 अथवा 18 कॅरेटचे दागिने बनवतात.

नोट- वर देण्यात आलेले सोने- चांदीचे दर सांकेतिक स्वरूपात आहेत. यामध्ये जीएसटी तसेच मेकींग चार्जेसचा समावेश केलेला नाही. योग्य दर जाणून घेण्यासाठी आपल्या नजीकच्या सराफा व्यापाऱ्यांशी संपर्क करा.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews