पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १३ सप्टेंबर २०२५ रोजी मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. २०२३ च्या हिंसाचारानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. ते प्रथम चुराचंदपूरला पोहोचले जिथे त्यांनी विस्थापित कुटुंबांना भेटले आणि शांततेचे आवाहन केले. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ७,३०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधान मोदींचा चुराचंदपूर आणि इम्फाळ या दोन्ही ठिकाणांचा दौरा खूप महत्त्वाचा आहे कारण हिंसाचारात या दोन्ही ठिकाणांवर परिणाम झाला होता. चुराचंदपूर हा कुकीबहुल भाग आहे तर इम्फाळमध्ये मोठ्या प्रमाणात मेईतेई समुदाय आहे.
मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई लोकांची लोकसंख्या किती? हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय किती आहेत?
Written by:Jitendra bhatavdekar
Last Updated:





