पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. अखेर पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आज 2 ऑगस्ट आहे. याबाबत आलेल्या अपडेटनुसार काही वेळात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा होणार!
2000 रुपये 2 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार अशी माहिती देण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरुन याबाबत घोषणा करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वरुन 20 व्या हप्त्याबाब घोषणा करण्यात आली आहे. आता अधिक वेळ वाट पाहावी लागणार नाही.
हे ही वाचा
पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता वाराणसीत सुरू होणार आहे. याच कार्यक्रमात ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करतील. त्याच वेळी पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे वितरण करतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पैसे ट्रान्सफर होणार आहेत.
20 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली!
पीएम किसान सन्मान निधी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्याकडून चालवली जाते. या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 ला करण्यात आली होती. तेव्हापासून पात्र शेतकऱ्यांना 19 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. 19 व्या हप्त्याची रक्कम बिहारमध्ये कार्यक्रम आयोजित करुन जारी करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली होती. त्या योजनेतून देखील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. या योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अपडेटसाठी योजनेची वेबसाईट आणि एक्स वरील योजनेचं अधिकृत खातं याशिवाय सोशल मीडियातून पसरवल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.