मोबाईल फोन चोरीच्या घटना आता केवळ स्थानिक पातळीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. लंडनहून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे सॅमसंगच्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स आणि डिव्हाइसेसने भरलेला एक ट्रक हीथ्रो विमानतळाजवळ चोरीला गेला आहे. हा ट्रक विमानतळावरून वेअरहाऊसकडे जात असताना त्याची चोरी झाली.

काय-काय चोरीला गेले?

कोरियन मीडिया Yonhap News TV च्या रिपोर्टनुसार, या ट्रकमध्ये अंदाजे 12,000 युनिट्स डिव्हाइसेस होत्या, ज्यात खालील गोष्टी समाविष्ट आहेत:
• 5,000 युनिट्स Galaxy Z Fold 7
• 5,000 युनिट्स Galaxy Z Flip 7
• 2,000 युनिट्स Galaxy Watch 8

तसेच ट्रकमध्ये Galaxy S25 सिरीज आणि Galaxy A16 चे युनिट्स देखील होते. या चोरीमध्ये एकूण मिळून 91 कोटी रुपये (सुमारे 10.9 मिलियन डॉलर) मूल्याच्या डिव्हाइसेस चोरीला गेल्या आहेत, असा अंदाज आहे.

सिनेस्टाईलने केली चोरी

ही चोरी अगदी चित्रपटासारख्या स्टाईलमध्ये करण्यात आली. ट्रक हीथ्रो विमानतळावरून बाहेर पडून वेअरहाऊसकडे जात असताना त्याला लक्ष्य करण्यात आले. ट्रकला नेमकं कुठे आणि कसं थांबवण्यात आलं किंवा त्यामधील सुरक्षा व्यवस्थेला कसं चकवा देण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पूर्वीही घडल्या आहेत अशा घटना

ही पहिलीच वेळ नाही आहे की सॅमसंगचे उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात चोरीला गेले आहे.
• 2020 मध्ये नोएडा (भारत) येथील सॅमसंग फॅक्टरीमधून 3.30 लाख डॉलर किमतीचे स्मार्टफोन पार्ट्स चोरीला गेले होते. त्या प्रकरणात 6 जणांना अटक झाली होती, ज्यामध्ये 3 ट्रक ड्रायव्हर्स होते.
• 2023 मध्ये अमेरिका येथील एका Apple Store मधून चोरट्यांनी जवळच्या कॉफी शॉपच्या बाथरूममधून सुरंग खोदून 436 iPhones चोरी केले होते, ज्यांची एकूण किंमत सुमारे 4 कोटी रुपये होती.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या उच्च-प्रोफाईल चोरीनंतर प्रश्न उपस्थित होत आहेत की, इतक्या महागड्या डिव्हाइसेसच्या ट्रान्सपोर्टेशनवेळी योग्य सुरक्षा उपाय का करण्यात आले नाहीत? सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत, मात्र अद्याप कोणतीही अटक करण्यात आलेली नाही.

सॅमसंगकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान नाही

या घटनेबाबत सॅमसंगकडून अजूनपर्यंत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. प्रकरण जसजसे पुढे जाईल, तसतशी अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तांत्रिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ही चोरी एक मोठा धक्का मानला जात आहे.