Air India Plane Accident : Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठी घटना

Published:
एअर इंडियाच्या A350 प्रकारच्या विमानाला रनवेवर बॅगेज कंटेनरची जोरदार धडक बसली. या अपघातात विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनचे नुकसान झाल्याची माहिती आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही
Air India Plane Accident : Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठी घटना

Air India Plane Accident : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानाचा गंभीर अपघात थोडक्यात टळला अस म्हणावे लागेल. एअर इंडियाच्या A350 प्रकारच्या विमानाला रनवेवर बॅगेज कंटेनरची जोरदार धडक बसली. या अपघातात विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनचे नुकसान झाल्याची माहिती आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नेमका कसा झाला अपघात (Air India Plane Accident)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, न्यूयॉर्ककडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतले होते, मात्र इराणचे हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे हे विमान पुन्हा दिल्लीला परतले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर दाट धुक्याच्या परिस्थितीत धावपट्टीवरून जात असताना, एका बॅगेज कंटेनरने विमानाच्या उजव्या इंजिनला धडक दिली. या धडकेत इंजिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची चर्चा असून, घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. Air India Plane Accident

विमानाची तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती सुरू

या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने सदर विमान तपासणी आणि दुरुस्तीसाठी ग्राउंडेड करण्यात आले आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “विमानाची सखोल तांत्रिक तपासणी सुरू असून आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच ते सेवेत दाखल केले जाईल. त्यामुळे काही उड्डाणांवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे.” प्रवक्त्याने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरम्यान, इराणचे हवाई क्षेत्र बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने गुरुवारी अमेरिकेसाठी जाणारी किमान तीन उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये
दिल्लीहून न्यूयॉर्कसाठी एक उड्डाण
दिल्लीहून नेवार्कसाठी एक उड्डाण
आणि मुंबईहून न्यूयॉर्कसाठीचे एक उड्डाण
यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews