Marathi News

Ajit Pawar plane crash: अजित पवारांसोबत विमानात कोणकोण होते? समोर आली मोठी माहिती

Published:
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात एकूण पाच जण होते.
Ajit Pawar plane crash: अजित पवारांसोबत विमानात कोणकोण होते? समोर आली मोठी माहिती

Ajit Pawar plane crash:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते लिअरजेट ४५ क्लास बिझनेस जेट होते. समोर आलेल्या माहितीनुसार बारामती विमानतळावर लँडिंग करताना हे विमान कोसळले. यामध्ये अजित पवार यांच्यासोबत पाच जणांचे निधन झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात एकूण पाच जण होते. यामध्ये एक पीएसओ, अजित पवार, एक अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर होते. क्रू मेंबरमध्ये पायलट (पीआयसी) आणि फर्स्ट ऑफिसर (एफओ) असल्याचे वृत्त समोर येत आहे. क्रू मेंबरची ओळख कॅप्टन सुमित कमल कपूर आणि कॅप्टन संभावी फाटक अशी झाली आहे, परंतु अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

विमानाच्या मालकी आणि ऑपरेशनबाबतच्या माहितीनुसार ही कंपनी व्ही.के. सिंग यांच्या मालकीची आहे आणि तिची कार्यालये दिल्लीच्या साउथ एक्सटेंशन आणि कॅनॉट प्लेस भागात असल्याचे सांगितले जात आहे.

माहितीनुसार, अजित पवार यांनी यापूर्वी सरकारला भविष्यातील घटना टाळण्यासाठी हवाई पट्टी रुंद करण्याची विनंती केली होती. हे विमान VT-SSK नोंदणी क्रमांक असलेले लिअरजेट ४५ होते. ऑपरेटर VSR ने विमान चालवले. बचाव आणि मदत पथके ताबडतोब घटनास्थळी पोहोचली, परंतु विमानातील कोणीही वाचले नाही.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews