Marathi News

भारतातील युवकानं दुबईत जिंकली 240 कोटींची लॉटरी, किती कर द्यावा लागेल?

Published:
भारतातील युवकानं दुबईत जिंकली 240 कोटींची लॉटरी, किती कर द्यावा लागेल?

म्हणतात ना कोणाचं नशीब कधी, कुठे आणि कसं फिरेल जाईल, हे कोणालाच ठाऊक नसतं! अबू धाबीमध्ये राहणाऱ्या एका साध्या भारतीय युवकासोबत असंच काहीसं काहीसं घडलं आहे. होय, या भारतीय युवकाने दुबईतील आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी तब्बल 240 कोटी रुपये जिंकले आहेत.

पण आता प्रश्न असा आहे एवढी प्रचंड रक्कम जिंकल्यानंतर, त्याला कर (Tax) म्हणून किती पैसे गमवावे लागतील?

लॉटरी विजेता कोण आहे?

अबू धाबीमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय भारतीय प्रवासी अनिलकुमार बोल्ला याचं नाव आज सगळीकडे चर्चेत आहे. कारण त्यांनी यूएईतील आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी जिंकली आहे, ज्याची रक्कम 100 मिलियन दिरहम, म्हणजे सुमारे 240 कोटी रुपये आहे.

ही मोठी जिंकणारी रक्कम यूएईच्या नवीन राष्ट्रीय लॉटरी प्रणाली “Lucky Day Draw” मध्ये 18 ऑक्टोबरला झालेल्या Draw #251018 मध्ये नोंदवली गेली. निकाल जाहीर होताच, अनिलकुमार बोल्ला करोडोंचे मालक बनले.

Follow Us :GoogleNews