Marathi News

बिअर आणि वाईन स्वस्त होणार!! तळीरामाना सरकारची गुडन्यूज

Published:
तळीरामांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. येत्या काळात वाईनप्रमाणेच बिअरच्या किमतीही लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील ऐतिहासिक फ्री ट्रेड डील (FTA) ला अधिकृत मंजुरी मिळाली असून, या करारामुळे जागतिक दर्जाची मद्य उत्पादने भारतीय ग्राहकांना आता अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत.
बिअर आणि वाईन स्वस्त होणार!! तळीरामाना सरकारची गुडन्यूज

तळीरामांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. येत्या काळात वाईनप्रमाणेच बिअरच्या किमतीही लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील ऐतिहासिक फ्री ट्रेड डील (FTA) ला अधिकृत मंजुरी मिळाली असून, या करारामुळे जागतिक दर्जाची मद्य उत्पादने भारतीय ग्राहकांना आता अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत.

भारत–युरोपियन युनियनमधील हा मुक्त व्यापार करार आतापर्यंतचा सर्वात मोठा मानला जात असून, युरोपियन नेत्यांनी याला “मदर ऑफ डील्स” अशी संज्ञा दिली आहे. या करारामुळे सुमारे २ अब्ज लोकांसाठी एक विशाल मुक्त व्यापार क्षेत्र तयार होणार असून, येत्या काही वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सार्वजनिक खरेदी व्यवस्थेवर त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे.

या करारानुसार, वाईनवरील सध्याचा १५० टक्के आयात कर थेट २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. तर बिअरवरील ११० टक्के कर आता ५० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे बिअर आणि वाईनसाठी ग्राहकांना जास्तीचा खर्च करावा लागणार नाही. या करकपातीचा थेट फायदा युरोपियन ब्रँड्सना होणार असून, त्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि भारतीय बाजारात स्पर्धा वाढेल.

९० टक्के उत्पादनांवरील टॅरिफ हटणार

युरोपियन युनियनच्या माहितीनुसार, या करारामुळे भारतात येणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक युरोपियन वस्तूंवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले जाणार आहे किंवा ते अत्यंत कमी केले जाईल. यामुळे युरोपियन निर्यातदारांची दरवर्षी सुमारे ४ अब्ज युरोची बचत होणार आहे. तसेच २०३२ पर्यंत युरोपकडून भारतात होणारी निर्यात दुप्पट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. युरोपीय तंत्रज्ञान कमी दरात उपलब्ध झाल्याने भारतातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

भारत युरोपियन युनियनला काय निर्यात करतो?

पेट्रोलियम उत्पादने (डिझेल, एटीएफ)
स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स
कापड आणि वस्त्र उद्योगातील उत्पादने
रसायने, पोलाद आणि यंत्रसामग्री
औषधे, दागिने आणि वाहनांचे सुटे भाग

या मुक्त व्यापार करारामुळे भारतीय कंपन्यांना युरोपमध्ये सोपी आणि कमी खर्चाची बाजारपेठ उपलब्ध होणार असून, त्यामुळे भारताच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews