मागील महिन्यात शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आता सरकारी पातळीवर काही मोठे बदल करण्यात येत आहे. 21 व्या हप्त्याच्या वितरणाला अद्याप काही महिन्यांचा अवकाश असला तरी सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही महत्वाचे बदल करत आहे. सरकारने काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना दिलासा तर काहींना हप्ता अडकण्याची भीती आहे. नेमकं सरकार कोणती मोहीम राबवत आहे, ते जाणून घेऊ…
२१ वा हप्ता नेमका कधी मिळणार?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीच सरकारने काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना दिलासा तर काहींना हप्ता अडकण्याची भीती आहे. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून 21 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नोव्हेंबर–डिसेंबरमध्ये हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. पण मागील वेळी आधार लिंक, केवायसी आणि चुकीची बँक माहिती यांसारख्या कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते. यावेळी अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी सरकार सज्ज झाले आहे. यासाठी सरकारने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे.





