पाणी संपतंय…! युनायटेड नेशन्सचा धक्कादायक अहवाल समोर; ‘या’ शहरात पाणी पूर्णपणे संपण्याची भीती

Written by:Smita Gangurde
Published:
ही चिंता वाढवणारी आकडेवारी युनायटेड नेशन्सच्या नवीन अहवालात समोर आली आहे.
पाणी संपतंय…! युनायटेड नेशन्सचा धक्कादायक अहवाल समोर; ‘या’ शहरात पाणी पूर्णपणे संपण्याची भीती

‘जल हेच जीवन ‘ शाळेत असताना अगदी सुरूवातीच्या वर्गांमध्ये आपण शिकलेलो ही ओळ… मात्र, हेच जीवन आता हळू हळू संपत चाललंय… जगाच्या निम्म्या लोकसंख्येला या जीवनाची म्हणजे पाण्याची टंचाई तीव्रतेने भासू लागलीय. ही चिंता वाढवणारी आकडेवारी युनायटेड नेशन्सच्या नवीन अहवालात समोर आली आहे.

पाण्याचा प्रश्न जगभरात पेटलाय!

4०० कोटी लोकांना पाणीटंचाईची झळ
100 सर्वात मोठ्या शहरांपैकी निम्म्या शहरांमध्ये पाणीबाणी
39 शहरांमध्ये पाण्याची अत्यंत गंभीर परिस्थिती
भारतातील मुंबई, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई शहरांचा समावेश
शिवाय हैदराबाद, अहमदाबाद, सुरत, पुण्यातही भीषण पाणीटंचाई

‘या’ शहरात पाणी पूर्णपणे संपण्याची भीती…

या अहवालानुसार, नद्या आणि तलाव आटत आहेत, भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे आणि पाणथळ जागा कोरड्या पडत आहेत. जमीन खचत आहे, सिंकहोल तयार होत आहेत आणि वाळवंट पसरत आहेत. दरवर्षी सुमारे 400 कोटी लोकांना किमान एक महिना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. अफगाणिस्तानची राजधानी काबुल हे पहिले आधुनिक शहर बनू शकते जिथे पाणी पूर्णपणे संपेल.

देऊळगावकरांनी म्हटल्याप्रमाणे अगदी 1990 पासून जगातील निम्म्या मोठ्या तलावांमधील पाणी कमी झालंय. जमिनीखालील पाण्याचे साठे सतत 70% पर्यंत कमी झाले आहेत. 1970 पासून हिमनद्यांचा आकार सुमारे 30% कमी झालाय. जगभरातील अनेक शहरं डे झिरोच्या म्हणजे अशा दिवसाच्या उंबरठ्यावर आहेत की जेव्हा नागरिकांसाठी अजिबात पाणी शिल्लक राहणार नाही. या शहरांच्या यादीत चेन्नईचाही नंबर लागतो. आपल्याकडेही लातूरमध्ये रेल्वेने पाणी पोहचवण्याची वेळ आली होती , ती दृश्य अजूनही आठवणीत ताजी आहेत. त्यामुळे, भविष्यात येऊ घातलेली ही भीषण, भयावह परिस्थिती टाळण्यासाठी पाण्याचा योग्य वापर हाच एक पर्याय आहे.

 

Follow Us :GoogleNews