नवी दिल्ली- बौद्ध धर्मगुरु दलाई लामा आज 90 वर्षांचे झाले. जन्मदिनाच्या चार दिवसांपूर्वी दलाई लामा यांनी त्यांचा उत्तराधिकारी तिबेटी परंपरेनुसार निवडला जाईल अशी घोषणा केली होती. दलाईम लामा यांचा गादेन फोडरंग ट्रस्टच ही निवड करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. यात चीनने हस्तक्षेप करत चिनी सरकारच्या मंजुरीशिवाय नव्या दलाई लामांची निवड होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
दलाई लामा कोण असतात?
तिबेटमधील बौद्ध धर्माचं दलाई लामा हे सर्वात मोठं धार्मिक पद आहे. सध्याचे दलाई लामा तेन्जिन ग्यास्तो हे दलाई लामाचं पद मिळवणारे 14 वे बौद्ध धर्मगुरु आहेत. दलाई लामा यांच्या मृत्यूमंतर त्यांच्या आत्म्याचा पुनर्जन्म होतो, अशी धारणा आहे. 1557 साली मंगोल शासक अलतान खानने दलाई लामाची परंपरा सुरु केली होती. त्यावेळी असलेल्या गुरु सोनम ग्यात्सो यांना तिसरं दलाई लामा म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पहिल्या दोन दलाई लामांना मरणोत्तर दलाई लामांची उपाधी देण्यात आली.
हे ही वाचा
दलाई लामांची निवड कशी केली जाते?
दलाई लामांच्या मृत्यूनंतर शोक समय संपल्यानंतर नव्या दलाई लामांची निवड करण्यात येते. दलाई लामा त्यांच्या मृत्यूपूव्री उत्तराधिकाऱ्याबाबत काही खुणा सांगतात. तर काही खुणा हा बौद्ध भिक्षूंकडून शोधण्यात येतात. मृत्यूच्या वेळी दलाई लामांची असलेली दिशा, मृत्यूनंतर बौद्ध भिक्षूंना स्वप्नातून ही दिशा ठरवण्यात येते. यात ज्योतिषही मदत करतात.
दलाई लामा यांच्या मृत्यूवेळी किंवा त्याच्या जवळपास च्या वेळी जन्मलेल्या मुलाचा शोध घेण्यात येतो. यात विशेष लक्षणं असलेल्या मुलाची निवड दलाई लामा म्हणून करण्यात येते. दलाई लामां होऊ शकणारे गुण असणाऱ्या मुलाची परीक्षा घेण्यात येते. त्याला दलाई लामांबाबत प्रश्न विचारले जातात. त्यांच्या वस्तू त्याला दाखवल्या जातात. जर या परीक्षेत हा मुलगा उत्तीर्ण झाला तर त्याला दलाई लामांचा पुनर्जन्म मानण्यात येतं. त्यानंतर या मुलाला बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार शिक्षण दिलं जातं.
पुढचा दलाई लामा कोण होणार?
सध्याच्या दलाई लामांनी पुनर्जन्मानुसारच नव्या दलाई लामांची निवड करण्यात येईल हे स्पष्ट केलंय. दलाई लामांनी तीन भविष्यवाणीही केल्या आहेत.
१. त्यांचा उत्तराधइकारी स्वतंत्र देशात जन्म घेणार असं सांगितलं आहे. त्यामुळे उत्तराधिकारी चीन किंवा तिबेटऐवजी भारतातील असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भारतात असलेल्या 1 लाख 40 हजार तिबेटींमधून नव्या दलाई लामांचा शोध घेण्यात येईल.
2. पुढचा दलाई लामा हा मुलगा नाही तर वयस्कर व्यक्ती असू शकतो
3. पुढचा दलाई लामा पुरुष असण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच पहिल्यांदा एखाद्या स्त्रीला दलाई लामा होण्याची संधी मिळू शकते.