Delhi Red Fort Blast : लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट!! राजधानी दिल्ली हादरली

Published:
लाल किल्ल्याचा हा परिसर म्हणजे नेहमीच नागरिकांनी गजबजलेला असतो. खास करून संध्याकाळच्या वेळीस याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.. अशावेळी त्याच टायमिंगला स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Delhi Red Fort Blast : लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट!! राजधानी दिल्ली हादरली

राजधानी दिल्लीतून एक मोठी आणि हादरवणारी बातमी समोर येत आहे. लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट (Delhi Red Fort Blast) झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक वर हा स्फोट झाला.6 वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटात 9 ते 10 लोकांचा जागीच प्राण गेला आहे. सर्वत्र आग आणि धुराचे वातावरण झालं असून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ? Delhi Red Fort Blast

लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला.हा  स्फोट एवढा भीषण (Delhi Red Fort Blast) होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या. विशेष म्हणजे कारमध्ये स्फोट झाल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या दोन कारला आग लागली.ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त 800 मिटर अंतरावर आहे. त्यामुळे या स्फोटाकडे घातपाताच्या नजरेतून बघितलं जात आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यामागचं कारण काय याचा तपास केला जात आहे.

घातपाताचा संशय

लाल किल्ल्याचा हा परिसर म्हणजे नेहमीच नागरिकांनी गजबजलेला असतो. खास करून संध्याकाळच्या वेळीस याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.. अशावेळी त्याच टायमिंगला स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर लाल किल्ला परिसर तातडीने रिकामा करण्यात आला.  एनएसजीचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. या घटनेनंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews