Ram Mandir Ayodhya: अयोध्येच्या श्री राम मंदिरात भक्तांकडून भरभरून दान; रक्कम ऐकून आश्चर्य वाटेल!

Written by:Rohit Shinde
Published:
अयोध्येतील राम मंदिरासाठी भक्तांनी आतापर्यंत 3 हजार कोटींहून अधिकचे दान केल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, आगामी काळात हा आकडा आणखी वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ram Mandir Ayodhya: अयोध्येच्या श्री राम मंदिरात भक्तांकडून भरभरून दान; रक्कम ऐकून आश्चर्य वाटेल!
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर हे आज संपूर्ण देशातील आणि जगभरातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे. राम जन्मभूमीवर उभे राहिलेले हे भव्य मंदिर भक्तांच्या भावनांशी जोडलेले आहे. दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि मोठ्या प्रमाणावर देणग्या अर्पण करतात. मंदिराच्या स्थापनेनंतर धार्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली असून अयोध्या हे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. अशा परिस्थितीत अयोध्येतील भक्तांकडून होणार दान मोठे आहे. कोट्यवधी रूपयांचे दान मंदिरात केले जात आहे.

भक्तांकडून कोट्यवधी रूपयांचे दान 

अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर तयार आहे. पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टप्प्याच्या कामाचे उद्घाटन करतील. दरम्यान, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले आहे की, राम मंदिराच्या बांधकामासाठी भाविकांनी ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी दिली आहे.

नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, २०२२ मध्ये निधी समर्पण अभियान सुरू झाल्यापासून देशभरातील भाविकांनी उदार हस्ते देणगी दिली आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी भाविकांनी ३,००० कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली आहे. मंदिराच्या कामाचा एकूण खर्च सुमारे १८०० कोटी रुपये इतका अंदाजित करण्यात आला आहे आणि आतापर्यंत सुमारे १५०० कोटी रुपयांचे बिल तयार करण्यात आले आहे. त्यामुळे अपेक्षित बांधकाम खर्चाच्या दुप्पट दान आजवर मिळाले आहे.

लवकरच बांधकामाचा तिसरा टप्पा

राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष मिश्रा म्हणाले की, २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण समारंभासाठी २०२२ नंतर देणगी देणाऱ्यांसह सर्व देणगीदारांना आमंत्रित केले जाईल. जवळपास 8 हजार लोकांना यावेळी आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराच्या पुढील कामाच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. शिवाय या ठिकाणी 8 हजार विशेष पाहुणे आणि साधु-संतांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे. त्यामुळे ही बाब विशेष आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews