ओला कंपनीने शहरांमध्ये प्रवास सुलभ आणि परवडणारा केला आहे. अॅपद्वारे सहज कॅब बुकिंग, वेळेची बचत आणि सुरक्षित प्रवास यामुळे नागरिकांचा ओला सेवांवर विश्वास वाढला आहे. रोजगारनिर्मिती, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे ओलाचे महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र, आता थेट या कंपनीच्या सीईओ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सीईओ भाविश अग्रवालच्या विरोधात FIR

बंगळुरु पोलिसांनी ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल आणि वरिष्ठ कार्यकारी सुब्रत कुमार दास यांच्या विरुद्ध आत्महत्येला प्रोत्साहन दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.  ओलाच्या एका कर्मचाऱ्यानं कथितपणे सप्टेंबर महिन्यात कामाच्या दबावामुळं जीवन संपवलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार 38 वर्षांच्या के. अरविंद या व्यक्तीं 28 पानांची नोट जीवन संपवण्यापूर्वी लिहिली होती. त्यामध्ये त्यानं त्याच्या वरिष्ठांवर कामाच्या ठिकाणी शोषणाचा आरोप केला होता. पोलिसांनी म्हटलं की के. अरविंद याच्या भावाच्या तक्रारीवरुन हा एफआयआर नोंदवण्यात आला.

के.अरविंदसोबत नेमकं काय घडलं?

के. अरविंद यानं कथितपणे त्याच्या घरी असताना विष प्यायलं होतं, ही घटना 28 सप्टेंबरला घडली होती. त्यानंतर त्याला एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचा जीव वाचला नव्हता. त्यानंतर कुटुंबाला एक नोट आढळली होती. ज्यामध्ये कामाच्या ठिकाणी सतत होणारं शोषण आणि ओलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला होता.

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे शोषण

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे शोषण वाढत चालले आहे. अनेक ठिकाणी कामाचे तास वाढवले जातात, पण त्यानुसार वेतन दिले जात नाही. काही कंपन्यांमध्ये मानसिक ताण, अपमानास्पद वागणूक आणि अन्यायकारक दबाव यामुळे कर्मचारी त्रस्त होतात. कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण निर्माण करणे ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे. कामगार कायद्यांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. कर्मचारी हे संस्थेचा कणा आहेत, त्यांचे हक्क आणि सन्मान जपणे हे व्यवस्थापनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. सशक्त कामगारवर्गाशिवाय कोणतीही संस्था दीर्घकाळ यशस्वी होऊ शकत नाही.