Marathi News

बिहार निवडणुकीच्या आधी मोठा उलटफेर; तेजस्वी यादवांवर महाराष्ट्र आणि युपीत एफआयआर दाखल

Written by:Rohit Shinde
Published:
तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यासोबतच एक कार्टून होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गया येथील रॅलीला फक्त भाषणबाजीचे दुकान असे त्यांनी संबोधले होते.
बिहार निवडणुकीच्या आधी मोठा उलटफेर; तेजस्वी यादवांवर महाराष्ट्र आणि युपीत एफआयआर दाखल

तिकडे उत्तरेत बिहार विधानसभेचे वातावरण तयार होत असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यानूसार, विधानसभा निवडणुकांची जोरदार (Bihar Elections 2025) तयारी सुरू आहे. त्यामुळे येथील राजकारण ढवळून निघत आहे. बिहारचे माजी उपमु्ख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीत तेजस्वी यादवाच्या अडचणींमध्ये वाढ होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तेजस्वी यादवांवर एफआयआर दाखल

तेजस्वी यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक कार्टुन शेअर केले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला ‘जुमलों की दुकान’ असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती. याच पोस्टमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. पंतप्रधान पदावरील व्यक्तीच्या बाबतीत अशा पद्धतीची टीका करणे नागरिकांना रुचले नाही. महाराष्ट्रातील गडचिरोलीचे भाजप आमदार मिलींद रामजी नरोटे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर केस दाखल करण्यात आली. त्यामुळे आता या निमित्ताने ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी यादवांच्या अडचणी वाढणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे देखील भाजपा महानगर अध्यक्ष शिल्पी गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बेलगाम टिप्पणीमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिल्पी गुप्ता यांनी केली आहे.

तेजस्वी यादवांच्या अडचणी वाढणार?

त्यामुळे आता ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यासोबतच एक कार्टून होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गया येथील रॅलीला फक्त भाषणबाजीचे दुकान असे त्यांनी संबोधले होते. या पोस्टमध्ये त्यांनी पीएम मोदींना एका दुकानदाराच्या रुपात दाखवले. दुकानाच्या साइन बोर्डावर लिहिले होते ‘बयानबाजी की मशहूर दुकान.’ त्यामुळे आता हे प्रकरण लांबल्यास तेजस्वी यादवांच्या अडचणी वाढणार आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews