Vande Bharat Sleeper Train : देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपरचं तिकीट किती असेल? कधीपासून होणार सुरू?

Written by:Smita Gangurde
Published:
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा आता संपणार आहे. पुढील आठवड्यापासून वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या भेटीला येणार आहे.
Vande Bharat Sleeper Train : देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपरचं तिकीट किती असेल? कधीपासून होणार सुरू?

Vande Bharat Sleeper Train : देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा आता संपणार आहे. पुढील आठवड्यापासून वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या भेटीला येणार आहे. यादरम्यान एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना या नव्या ट्रेनमध्ये आरएसी म्हणजेच रिजर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशनसारख्या सुविधा मिळणार नाहीत. सोबतच याचं तिकीट राजधानी एक्सप्रेससारख्या ट्रेनपेक्षा जास्त असू शकतं. स्लीपर ट्रेनची सुरुवात गुवाहाटी ते हावडा या मार्गावरुन होणार आहे. आतापर्यंत वंदे भारतच्या चेअर कार धावत होत्या, यंदा पहिल्यांदाच वंदे भारतची स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या भेटीला आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार हिरवा कंदील

इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, प्रवाशांना कमीत कमी ४०० किमी अंतराइतके पैसे मोजावे लागतील. ९ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या पत्रामध्ये अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला आहे. केवळ कन्फर्म तिकीटावरुन या ट्रेनमधून प्रवास करता येईल. आरएसी किंवा वेटलिस्ट किंवा पार्शियली कन्फर्म तिकिटाचा पर्याय उपलब्ध नसेल. सर्व तिकीट आरक्षित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात या स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. अन्य ट्रेनप्रमाणेच वंदे भारत स्लीपरमध्येही महिला, दिव्यांग आणि वरिष्ठांसाठी कोटा असेल.

तिकीट दर किती असतील?

3एसीसाठी प्रवाशांना २.४ रुपये प्रति किती, २एसीसाठी ३.१ रुपये प्रति किमी आणि १एसीसाठी ३.८ रुपये प्रति किमी तिकीट आकारलं जाईल. म्हणजेच थर्ड एसीसाठी ९६० रुपये, सेकंड एसीसाठी १२४० रुपये आणि फर्स्ट एसीसाठी १५२० रुपये तिकीट असेल. सद्यस्थितीत ही ट्रेन दोन शहरांमधील १२०-१३० किमी प्रति तास वेगाने आसाम आणि पश्चिम बंगालच्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये धावेल. या स्लीपर वंदे भारत ट्रेनची ३० डिसेंबर रोजी चाचणी घेण्यात आली, ज्याचा वेग ताशी १८० किमी होता. उल्लेखनीय म्हणजे, जास्त वेग असूनही, टेबलावरील पाण्याचे ग्लास देखील हलले नाही. यावरुन वंदे भारतचं उत्कृष्ट सस्पेंशन आणि स्थिरता दर्शवते.

 

 

 

 

Follow Us :GoogleNews