MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघेंना अटक; पत्नीचा ‘तो’ कार्यक्रम भोवला!

Written by:Rohit Shinde
Published:
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघेंना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची सध्या अवघ्या जगाच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघेंना अटक; पत्नीचा ‘तो’ कार्यक्रम भोवला!

श्रीलंकेच्या राजकीय वर्तुळातून खरंतर मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघेंना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे यामध्ये विक्रमसिंघेंना पत्नीचा पदवी समारंभ भोवला आहे, या ठिकाणी नेमकं पत्नीने असे काय केले की विक्रमसिंघेंना अटक करण्याची वेळ आली त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

रानिल विक्रमसिंघेंना अटक 

श्रीलेकेत मोठी घडामोड घडल्याचे समोर आले असून, माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना सीआयडीने अटक केली आहे. सरकारी निधीचा गैरवापर केल्याबद्दल विक्रमसिंघे यांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  विक्रमसिंघे हे २०२२ ते २०२४ पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्रपती होते. त्यांच्याकार्यकाळात श्रीलंकेत सत्तापालटाची परिस्थिती निर्माण झाली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये विक्रमसिंघे राष्ट्रपती असताना त्यांच्या पत्नीच्या ब्रिटीश विद्यापीठात झालेल्या समारंभात सहभागी होण्यासाठी लंडनला गेले होते, यासाठी त्यांनी सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोर विक्रमसिंघे यांच्यावर आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी विक्रमसिंघे आज कोलंबो येथील गुन्हे अन्वेषण विभागात सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी दाखल झाले होते.

‘तो’ पदवी समारंभ आणि अटक

चौकशीअंती रानिल यांना अटक करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये राष्टपती असताना ब्रिटिश विद्यापीठात त्यांच्या पत्नीसाठी आयोजित समारंभात सहभागी होण्यासाठी लंडनला गेले होते. त्यावेळी त्यांनी सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. माजी राष्ट्रपतींसोबत दहा जणांचा ताफा होता आणि या प्रवासात सरकारला सुमारे १६.९ दशलक्ष रुपये खर्च आला. त्यावेळी विक्रमसिंघे क्युबा आणि अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर होते आणि त्यांनी अमेरिकेपासून युकेपर्यंतचा प्रवास खाजगी दौरा म्हणून केला होता, असेही उघड झाले आहे. २०२२ ते २०२४ पर्यंत श्रीलंकेचे राष्टपती राहणारे विक्रमसिंघे हे अलिकडच्या काळात अटक झालेले सर्वात वरिष्ठ राजकीय व्यक्ती आहेत.

त्यामुळे या घटनेची सध्या श्रीलंकेच्या आणि अवघ्या जगाच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.