हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी; मृतांचा आकडा 380 वर, जनजीवन विस्कळीत

Written by:Rohit Shinde
Published:
हिमाचल प्रदेशात जोरदार पावसामुळे हाहाकार माजला असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. ज्यामुळे वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. मृतांचा आकडा 380 वर पोहोचला आहे...
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी; मृतांचा आकडा 380 वर, जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशला गेल्या काही दिवसांत पाऊस काळ बनून कोसळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत पावसामुळे हाहाकार माजला आहे. भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. तब्बल 577 रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामध्ये तीन राष्ट्रीय महामार्गांचा समावेश असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

380 नागरिकांनी जीव गमावला; मोठी वित्तहानी


यावर्षी राज्यात 20 जूनला मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर आतापर्यंत पूर आणि भूस्खलनामुळे 380 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 48 जण भूस्खलनात, 17 जण ढगफुटीत, 11 जण पुरात तर 165 जण विविध रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. तसेच, अजूनही 40 जण बेपत्ता असल्याची नोंद आहे.

निसर्गाच्या या रौद्ररुपामुळे हिमाचलमध्ये गंभीर चित्र असून राज्याला 4,306 कोटी रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, बंद पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. भूस्खलनामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड साचल्याने पुनर्बांधणीला वेळ लागत आहे.

4 हजार कोटींचे नुकसान; मोठी जीवितहानी

हिमाचलमध्ये पावसाने खूप हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे ढगफुटी, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या तीन महिन्यांत झालेल्या आपत्तीमुळे राज्याला तब्बल ४,०७९ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील परिस्थितीत गंभीर होती, आता स्थिती काहीशी नियंत्रणात येत आहे. त्यामध्ये इतरही काही महत्वाचे आकडे समोर येत आहेत.

नेक घरं जमीनदोस्त झाली, तर शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. मुसळधार झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला. राष्ट्रीय महामार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या, काही ठिकाणी मार्ग पूर्णपणे बंद पडले. ढगफुटीच्या घटनांमुळे काही गावे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचली आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews