ढगफूटी आणि भूस्खलनामुळे हिमाचलचे नागरिक भयभीत; नैसर्गिक संकटांची मालिका थांबेना!

Written by:Rohit Shinde
Published:
हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद पडले आहेत. पर्यावरणात अनेक मोठे बदल झाल्याने...
ढगफूटी आणि भूस्खलनामुळे हिमाचलचे नागरिक भयभीत; नैसर्गिक संकटांची मालिका थांबेना!

हिमालच प्रदेशचे नैसर्गिक सौंदर्य स्वर्गापेक्षा कमी नाही, परंतु पर्यावरणीय बदलांमुळे हिमाचल आता नैसर्गिक आपत्तीमुळे चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद पडले आहेत. ढगफुटी आणि पुराने येथे देशभरातील पर्यटक अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातीलही ६०० पर्यटक येथे अडकून पडले आहेत. गेल्या शतकात हिमाचल प्रदेशचे तापमान सरासरी 1.6 °C तक वाढले आहे. त्यानंतर येथील पर्यावरणात बदल झाला आहे. नैसर्गिक संकटाचे प्रमाण आणि तीव्रता वाढत चालली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात निसर्गाने हाहाकार माजवला आहे. येथे ढगफुटीने आणि पुराने आपले ६०० हुन अधिक पर्यटक अडकले आहेत.या भागातील पर्वतातील विकास कामे या नैसर्गिक संकटांना आमंत्रण ठरत आहे.

ढगफूटी आणि भूस्खलनाच्या घटनांत वाढ

वाढत्या तापमानामुळे वातावरणात अधिक आद्रता तयार झाली आहे. त्यामुळे अचानक मोठी पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे अचानक येणारा पूर आणि भूस्खलन वाढले आहे. शिवाय हिमाचलचा सुमारे ४५ टक्के क्षेत्र भूस्खलनस, पुर आणि हिमस्खलनाची उच्च जोखीमेखाली आहे. त्यामुळे जर जलद उपाय योजले नाहीत तर साल २१०० मध्ये सरासरी तापमानात अतिरिक्त 3-5 °C वाढ होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक संकटाचे तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी वर्तविली आहे. डोंगर कापल्याने रस्ते बांधल्याने पर्वतातील स्थिरता भंग झाली आहे. त्यातच जोरदार पर्जन्यवृष्टीने येथील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व वाढत्या घटनांमुळे हिमाचल प्रदेशचे नागरिक मात्र चांगलेच भयभीत झाले आहेत.

नैसर्गिक आपत्ती वाढल्या; नागरिक भयभीत

हिमाचल प्रदेशात ढगफूटी आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे डोंगर उतारांवर माती सरकणे, रस्ते बंद होणे, घरे कोसळणे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. यामुळे शाळा, दळणवळण व दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यटकांची संख्या घटली असून स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. प्रशासन आपत्कालीन उपाययोजना करत असले तरी नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिक सतत धास्तावलेले आहेत. हवामान बदलाचा प्रभाव अधिक तीव्र जाणवू लागल्याने भविष्यात आणखी गंभीर संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतर्क झाले आहेत.