India National Anthem : राष्ट्रगीतातील उत्कल या शब्दाचा अर्थ काय आहे ?? 99 टक्के लोकांना माहिती नसेल

Published:
भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले असून देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचा उल्लेख या राष्ट्रगीतामध्ये बघायला मिळतो.  भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. मात्र या राष्ट्रगीतामधील 'उत्कल' शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? चला आम्ही तुम्हाला सांगतो.
India National Anthem : राष्ट्रगीतातील उत्कल या शब्दाचा अर्थ काय आहे ?? 99 टक्के लोकांना माहिती नसेल

India National Anthem : भारताचा 77 व्या प्रजासत्ताक दिन आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी राष्ट्रगीत म्हटले जाते. भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले असून देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचा उल्लेख या राष्ट्रगीतामध्ये बघायला मिळतो.  भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. मात्र या राष्ट्रगीतामधील ‘उत्कल’ शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? चला आम्ही तुम्हाला सांगतो.

उत्कल म्हणजे ओडिशा (India National Anthem)

मित्रांनो राष्ट्रीय म्हणताना पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड… यावरून आपल्याला हे समजते की पंजाब म्हणजे पंजाब राज्य सिंधू म्हणजे सध्या पाकिस्तानातील सिंध प्रांत … गुजरात म्हणजे गुजरात राज्य मराठा म्हणजे महाराष्ट्राचा प्रदेश आणि ग्रामीण म्हणजे दक्षिण भारतीय संस्कृती असा त्याचा अर्थ होतो मात्र यातील उत्कल शब्दाचा अर्थ नेमका कशाशी संबंधित आहे हे मात्र अनेकांना अजूनही माहीत नाही. तर हा उत्कल शब्द ओडिशा राज्यासाठी राष्ट्रगीतात वापरला आहे. India National Anthem

उत्कल हे ओडिशाचे प्राचीन नाव

उत्कल हे ओडिशा राज्याचं प्राचीन नाव आहे. उत्कल शब्दाचा अर्थ ‘उत्कृष्टतेची भूमि’ किंवा ‘कला संपन्न भूमि’ असा होतो.  हा शब्द ओडिशासाठी वापरल्याचं लक्षात घेतल्यास सात शब्दांमध्ये संपूर्ण भारताचा उल्लेख टागोरांनी केल्याचं लक्षात येतं. पूर्वेकडून सुरुवात केली तर बंगाल, ओडिशा, खाली दक्षिणेचा उल्लेख द्राविड, उत्तरेतील पंजाब आणि सिंध म्हणजे आताचा अख्खा पाकिस्तान, पश्चिमेला गुजरात आणि मराठा म्हणजे महाराष्ट्र असा सारा भारतीय भूभाग भारताचा जयघोष करतो असं राष्ट्रगीतात म्हटलं आहे.