Indian Railway : होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने यंदा मोठं नियोजन जाहीर केलं आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने यंदा तब्बल 1500 होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळातील तिकीट टंचाई आणि वेटिंग लिस्टचा त्रास कमी करण्यासाठी हे विशेष पाऊल उचलण्यात आले आहे.
यंदाचे नियोजन विक्रमी (Indian Railway)
होळीच्या काळात विशेषतः मुंबई–कोकण, उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्वेकडील राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. गेल्या वर्षी होळी दरम्यान सुमारे 1144 विशेष फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. यंदा मात्र रेल्वेने हा आकडा थेट 1500 फेऱ्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे वेटिंग तिकिटांचा ताण कमी होईल, अधिक प्रवाशांना कन्फर्म सीट मिळेल, अनधिकृत प्रवास आणि गर्दीवर नियंत्रण येईल.
प्रमुख रेल्वे झोननुसार विशेष गाड्यांची संख्या:
पूर्व मध्य रेल्वे (ECR) — 285 गाड्या (सर्वाधिक)
पश्चिम रेल्वे (WR) — 231 गाड्या
मध्य रेल्वे (CR) — 209 गाड्या (मुंबई–पुणे प्रवाशांसाठी मोठा दिलासा)
दक्षिण मध्य रेल्वे (SCR) — 160 गाड्या
उत्तर रेल्वे (NR) — 108 गाड्या
उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) — 71 गाड्या
उत्तर मध्य रेल्वे (NCR) — 66 गाड्या
उत्तर पूर्व रेल्वे (NER) — 62 गाड्या
पूर्व तट रेल्वे (ECOR) — 62 गाड्या
दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) — 47 गाड्या
पश्चिम मध्य रेल्वे (WCR) — 43 गाड्या
दक्षिण रेल्वे (SR) — 39 गाड्या
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) — 15 गाड्या
कोंकण रेल्वे (KR) — 9 गाड्या
पूर्वोत्तर सीमांत रेल्वे (NFR) — 2 गाड्या






