Marathi News

इस्रायलचा गाझावर पु्न्हा हवाई हल्ला; अनेक निष्पाप नागरिकांचा बळी

Written by:Rohit Shinde
Published:
मध्य-पूर्वेतील संघर्ष काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. अचानक शुक्रवारी रात्रीपासून इस्रायलने गाझापट्टीवर पुन्हा हवाई हल्ले केले आहेत.
इस्रायलचा गाझावर पु्न्हा हवाई हल्ला; अनेक निष्पाप नागरिकांचा बळी

अमेरिकेसोबतच्या संघर्षानंतरही इस्रायलची इतर राष्ट्रांसोबतच्या संघर्षाची खुमखुमी संपताना दिसत नाही. शुक्रवारी रात्रीपासून इस्रायलने गाझापट्टीवर पुन्हा हवाई हल्ले केले आहेत. त्यात निष्पाप नागरिकांसह 66 बालकांचा नाहक बळी गेला आहे. यामुळे मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

इस्रायल-गाझा संघर्ष पेटणार?

इस्रायल सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. हमासचा पूर्णपणे नाश करून ओलिसांना मुक्त करण्यासाठी तसेच गाझाने यापुढे इस्रायलसाठी कोणताही धोका निर्माण करू नये, यासाठी हे युद्ध चालू असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी सकाळपर्यंत गाझा शहरातील मुवासी येथील छावणीवर आणि पॅलेस्टाईन स्टेडियमजवळ हे हल्ले करण्यात येत होते. 23 जूनला या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली होती.

मात्र इस्रायलने ही युद्धबंदी तोडत पुन्हा गाझावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये सुमारे आतापर्यत 81 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात 66 लहान बालकांचा समावेश आहे. अशी माहिती गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. इराणशी शस्त्रसंधी केल्यांनतर पुन्हा इस्रायलने गाझावर आपला निशाणा साधला. मात्र यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेला.

अमेरिकेच्या प्रयत्नांना अपयश

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दोन्ही देशांमधील युध्दविरामाच्या प्रयत्नांना मोठे अपयश आल्याचे दिसून येत आहे. गाझापट्टीवरील या हल्ल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.  डोनाील्ड ट्रम्प सातत्याने आपण जागतिक शांततेसाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे सांगताना दिसतात. त्यामुळे आता परिस्थितीत ट्रम्प काय भूमिका घेणार, याकडे आता अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews