इराकच्या अल-कूत शहरात एका मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही दुर्घटना गुरुवारी घडली असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाच मजली इमारत आगीच्या भक्षस्थानी पडलेली दिसत आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्रशासनाने प्राथमिक तपास सुरु केला असून पुढील दोन दिवसांत त्याचा अहवाल जाहीर केला जाईल. अशी माहिती मिळत आहे.
अनेक नागरिक थोडक्यात बचावले; मृतांचा आकडा 50
अनेक नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले असले तरी काही जण आत अडकून पडले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीच्या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 50 लोकांनी जीव गमावल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नेमकी काय घटना, आगीचे कारण काय?
इराकच्या कुत (Al‑Kut), वासित प्रांतातील एका हायपरमार्केट/मॉलमध्ये १६ जुलै २०२५ मध्यरात्री मोठा आग लागल्याची घटना घडली आहे. बहु–मजल्यांच्या (5‑6 मजले) नव्या हायपरमार्केटमधील आग पहिल्याच मजल्यावर पेटली, नंतर संपूर्ण इमारत भस्सारू लागली.त्यात किमान 60 ते 61 लोक ठार झाले, ज्यात महिलां आणि मुलांचा समावेश आहे; 11 जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांचा मोठा भाग हॉटेलच्या किंवा मॉलच्या बाथरुममध्ये अडकल्याने धूम्राच्या श्वासांनी झाल्याचे सांगण्यात येत आहे .14 जण इतके जळून ओळखण्यात येऊ शकले नाहीत . बचावपथकाने 45 पेक्षा जास्त लोकांना बाहेर काढले . इराक प्रांतीय राज्याने 3 दिवस शोक घोषित केला . संबंधित मॉल आणि इमारत मालकावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.





