देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांच्या आईचा AI च्या माध्यमातून व्हायरल केलेला डीपीफेक व्हिडिओ देशभरात चर्चेचा विषय ठरला. या व्हिडिओ नंतर भाजपने काँग्रेसवर टीकेची सोड उठवली काँग्रेसची आयटी सेलवर गुन्हाही दाखल झाला. या सर्व प्रकरणावर आज मोदींनी प्रथमच भाष्य केलं मी शंकराचा भक्त आहे विषयी पिऊ शकतो पण कोणत्याही आईचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत मोदींनी नाव न घेता काँग्रेसला सुनावल.

काय म्हणाले मोदी? Narendra Modi

पंतप्रधान मोदी आसाम दौऱ्यावर आहेत. दरंग येथे त्यांनी सुमारे १८,५३० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी आयोजित सभेत मोदींनी काँग्रेसवर तिखट शब्दात वार केला. तुम्ही मला कितीही शिव्या दिल्या तरी काही फरक पडत नाही. मी भगवान शिवाचा भक्त आहे… मी विषही पिऊ शकतो. पण जेव्हा एखाद्या आईचा अपमान होतो किंवा देशाच्या महान सुपुत्रांचा अपमान होतो तेव्हा मी ते सहन करू शकत नाही अस म्हणत मोदींनी विरोधकांना ठणकावलं. (Narendra Modi)

माँ कामाख्याच्या आशीर्वादाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी –

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर आसाममध्ये आपला हा पहिलाच दौरा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर नंतर आसामला हा माझा पहिलाच दौरा आहे. माँ कामाख्याच्या आशीर्वादाने ऑपरेशन सिंदूर खूप यशस्वी झाले. म्हणूनच, आज माँ कामाख्याच्या भूमीवर येऊन मला एक वेगळाच पवित्र अनुभव येत आहे. आज येथे जन्माष्टमी साजरी केली जात आहे असं म्हणत होते मी उपस्थितांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसवर निशाणा साधत मोदींनी सवाल केला की,  भूपेन हजारिका यांना भारतरत्न देण्याचा निर्णय योग्य होता की नाही?? यावेळी मोदींनी आठवण करून दिली की भूपेन हजारिका यांना भारतरत्न देण्याबाबत काँग्रेस अध्यक्षांनी टोमणा मारला होता की मोदी हा सन्मान “नर्तक-गायक” यांना देत आहेत. खरं तर हा आसाम आणि ईशान्येकडील लोकांचा अपमान आहे, जो भाजप कधीही सहन करणार नाही असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.