Next Generation GST Reform Prime Minister Narendra Modi : भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर जीएसटीबाबत मोठी घोषणा केली आहे. मोदी म्हणाले, यंदा दिवाळीत देशवासियांना मोठी भेट मिळणार आगे. ज्यासाठी सरकार नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्मवर काम करीत आहे. यानंतर मंत्रालयाने कौन्सिलकडे आवश्यक वस्तूंवरील जीएटी १२ वरुन ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती केली आहे. जर जीएसटी १२ वरुन ५ टक्क्यांपर्यंत कमी झाला तर सर्वसामान्यांना किती दिलासा मिळू शकतो.
१ जीएसटीमध्ये बदल केल्यामुळे नागरिक खाण्या-पिण्याच्या वस्तू जास्त प्रमाणात खरेदी करू शकतात. जीएसटी कमी झाल्यामुळे वस्तूंच्या किमती कमी होतील. यामुळे दुकानदारांची विक्रीही वाढेल.
मीठ अन् तेल…
सध्या ब्रँडेड आणि पॅकेजमधील तेल आणि फरसाणवर १२ टक्के जीएसटी घेतला जातो. जर एखाद्या ब्रँडेड पाकिटातील फरसाणचं एक पॅकेट १०५ रुपयांना विकलं जात तर यावर १२ रुपये जीएसटी लागतो. हा जीएसटी कमी होऊन पाच टक्क्यांवर पोहोचला तर १२ रुपयांवरुन ५ रुपये जीएसटी द्यावा लागेल. त्यामुळे हे पॅकेट सात रुपयांनी स्वस्त होईल.
मोहरीच्या तेलाच्या १ लिटर पाकिटाची किंमत २१० रुपये आहे. यावर सध्या २५ रुपये जीएसटी लागतो. जर तेल ५ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये ठेवलं तर टॅक्स घटून १०.५० रुपये इतका होईल, म्हणजे एक किलो मोहरीचं तेल १५ रुपयांनी स्वस्त होईल.
तूप..
तूपाचं एक किलोचं पाकिट ६७५ रुपये आहे. यावर सध्या १२ टक्के जीएसटी लागतो. जर तूप ५ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये आलं तर टॅक्स सात टक्क्यांपर्यंत कमी होईल. म्हणजे एक किलो तुपामागे ४८ रुपये कमी होतील.
पेरूचा रस…
बाजारातील पेरूच्या ब्रँडेड रसाच्या एक लिटर पाकिटाची किंमत ११२ रुपये आहे. यासाठी १२ टक्के जीएसटी आकारला जातो. म्हणजे १३.४४ रुपये सरकारकडून टॅक्स घेतला जातो. जर एक लिटर ज्यूस पाकिट पाच टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आला तर यावरील टॅक्समध्ये घट होऊन ५.६० पर्यंत असेल. म्हणजे एक लिटर फ्रूट ज्यूस साधारण ७ रुपयांनी स्वस्त होईल.
लोणी
बाजारात १०० ग्रॅमचं पाकिट सध्या ६२ रुपयांनी विकलं जातं. यावर साधारण ७.४५ रुपये जीएसटी लागतो. जर लोणी पाच टक्के जीएसटीअंतर्गत आला तर यावरील कर केवळ ३.१० रुपयांपर्यंत राहील. म्हणजे १०० ग्रॅम लोणीचं पॅकेट ४ ते ४.५० रुपयांनी स्वस्त होईल.





