रशिया आणि युक्रेनमध्ये शस्त्रसंधी नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं स्पष्ट

Written by:Smita Gangurde
Published:
युक्रेन सिक्युरटी गॅरेटीसाठी ८ लाख कोटींची हत्यारे खरेदी करणार
रशिया आणि युक्रेनमध्ये शस्त्रसंधी नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं स्पष्ट

वॅाशिंग्टन डीसी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनने राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की आणि युरोपियन नेत्यांसोबत मिटिॅग घेतली. यात रशिया आणि युक्रेन यांच्यात शस्त्रसंधीबाबत सहमती होऊ शकली नाही. इतक्या लवकर शस्त्रसंधी होणार नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

मात्र मिटिंगमध्ये युक्रेनच्या सुरक्षेच्या हमीबाबत चर्चा झाली. अमेरिका आणि युरोपियन देश एकत्रितरित्या यासाठी काम करतील असं ट्रम्प यांनी सांगितलंय. दुसरीकडे रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने सांगितलं की ही बैठक सुरु असताना मध्ये ही बैठक थांबवून ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी फोनवरुन सुमारे ४० मिनिटे चर्चा केली.

या संभाषणात पुतीन यांनी युक्रेनसोबत प्रतिनिधींच्या माध्यमातून थेट चर्चेचं समर्थन केलं. या संभाषणात झेलेन्स्की यांच्याशी १५ दिवसांत थेट भेटीसाठी पुतीन राजी झाल्याची माहिती जर्मन चान्सलर प्रेडरिक मर्त्ज यांनी दिलीय. मिटिंगनंतर झेलेन्स्की यांनी पत्रकार परिषद घेतली. युक्रेनच्या सुरक्षेच्या बदल्यात युरोपच्या पैशांतून ९० अब्ज डॅीलर्सची शस्त्रास्त्र अमेरिकेकडून खरेदी करणार आहे. ही माहिती झेलेन्स्की यांनी दिलीय. ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पुढील बैठक मॅास्कोत करण्याचा प्रस्ताव पुतीन यांनी दिला होता. मात्र झेलेन्स्की यांनी हा प्रस्ताव फेटाळल्याचं सांगण्यात येतंय.

मिटिंगमध्ये नेमकं काय घडलं ?

डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट केलं की बाटलीत काहीही झालं तरी अमेरिका युक्रेनच्या मागे उभी आहे. युक्रेन नाटोचा सदस्य नसला तरी अमेरिका युक्रेनला संरक्षण देईल. युक्रेनमध्ये शांतता आणण्यासाठी अमेरिकन सैनिक पाठवण्याबाबत विचार करणार. युद्ध नक्की संपेल पण ते कधी संपेल हे आत्ता सांगता येणं शक्य नाही. रशिया, अमेरिका आणि युक्रेनची एकत्र बैठक होईल त्यात युद्ध संपल्याची घोषणा होवू शकते. युद्ध थांबवण्याची बोलणी करण्यासाठी शस्त्रबंदीची गरज नाही.

झेलेन्स्की काय म्हणाले

झेलेन्स्की यांनी युक्रेची बाजू मांडली. राजनैतिक चर्चेचा मार्ग अवलंबणार मात्र जमीन अदलाबदलीचा प्रस्ताव नामंजूर असल्याचं त्यांनी सांगितलं. युद्ध संपल्यावर युक्रेनमध्ये राष्ट्र्पती पदाची निवडणूक शक्य , सध्याच्या युद्धाच्या स्थितीत निवडणूक होणं शक्य नसल्याचं त्यांनी स्रष्ट केलंय युक्रेनच्या सुरक्षेसाठी अमेरिकेची शस्त्रास्त्र गरजेची आहेत, अशी सुरक्षा यंत्रणा इतर कुठल्याही देशाकडे सध्या नाही असंही ते म्हणाले.