सुहाना सफर और ये मौसम हंसी… केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच गाणं, व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Written by:Astha Sutar
Published:
सुहाना सफर और ये मौसम हंसी... हमे क्या पत्ता... असं गाणं त्यानी मोठ्या आवाजात गायलं आहे. त्याला टाळ्या आणि शिट्ट्याच्या आवाजात रेल्वे डब्यातील लोकांनी, प्रवाशांनी प्रतिसाद दिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
सुहाना सफर और ये मौसम हंसी… केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच गाणं, व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Jyotiraditya Scindia – माणसाच्या आयुष्यात थकवा घालवण्यासाठी आणि रिफ्रेश होण्यासाठी आयुष्यात संगीत, मनोरंजन आणि काव्य हे तीन असेल तर जगण्याला खरी मजा. अन्यथा माणसाचं आयुष्य निरर्थक असल्याचे बोलले जाते. माणूस एकांदात असो किंवा सार्वजनिकरित्या तो कुठेही गाण गुणगुनत असतो. आता याला राजकीय नेतेही अपवाद नाहीत. अभिनेत्यांचे नेत्यांनी गाणी गायल्याचे आपण यापूर्वी अनेक किस्से ऐकले आहेत… पाहिले आहेत… पण आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा रेल्वेचा प्रवास करताना “सुहाना सफर और ये मौसम हंसी… हमे क्या पत्ता…” हे लोकांच्या समवेत गाण गायले आहे. सध्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचे हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

जिंदगी एक सफर है सुहाना…

दरम्यान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे रेल्वेचा प्रवास करताना गाण गायले आहे. तसेच रेल्वे गाडीतील लोंकांनीही “जिंदगी एक सफर है सुहाना… यहा कल क्या हो किसने जाना…” हे गाणे गायले. त्याला ही केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी साथ दिली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गाण्याला लोकांकडून ही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे रेल्वेने प्रवास करताना वायरल व्हिडिओतून दिसत आहे.

तसेच त्यांच्यासोबत काही प्रवासी आणि पक्षाचे कार्यकर्तेही असल्याच व्हिडिओतून दिसत आहे. यावेळी सुरुवातीला लोकांनी गाणे म्हटल्यानंतर त्यांच्या सुरात सुरू मिसळून सुहाना सफर और ये मौसम हंसी… हमे क्या पत्ता… असं गाणं त्यानी मोठ्या आवाजात गायलं आहे. त्याला टाळ्या आणि शिट्ट्याच्या आवाजात रेल्वे डब्यातील लोकांनी, प्रवाशांनी प्रतिसाद दिला आहे. हा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. नेटकरी त्याला शेअर करत आहेत.

घटना नेमकी कोणती?

दुसरीकडे या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि व्हिडिओत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया तसेच त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते, प्रवासी गाण गाताना दिसत आहेत. पण हा व्हिडिओ नेमका कोणता आहे? असं काहीजन प्रश्न विचारत आहेत. तर हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचे दिसते. संपूर्ण गाणं म्हटल्यानंतर “आप मेरे साथ अभी अशोक नगर चलो…” असं ज्योतिरादित्य सिंधिया हे लोकांना सांगत आहेत. यावरून हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे कार्यक्रमाला किंवा पक्षाच्या कार्यक्रमाला जात असल्याचे दिसते. कारण त्यांच्या गळ्यात पिवळ्या रंगाचा दुप्पटा असल्याचे दिसून येत आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews