Republic Day Parade 2026 : आज संपूर्ण भारतात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचं प्रदर्शन पहायला मिळालं. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश आहे. महाराष्ट्राचे चित्र हे गणपतीच्या थीमवर आधारित होते. या चित्ररथात गणेशोत्सव जो महाराष्ट्राचा राज्यउत्सव आहे त्या गणेशोत्सवाचं सादरदीकरण करण्यात आलं. कर्तव्यपथावर गणपती बाप्पा आला अन् मोदी बघतच राहिले.
एकूण 17 राज्यांचे चित्ररथ – Republic Day Parade 2026
कर्तव्यपथावर एकूण 17 राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळाले, त्याचबरोबर सरकारच्या विविध विभागांचे असे एकूण 30 चित्ररथ पाहायला मिळाले. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथात कडे सर्वांचे लक्ष वेधलं. यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथाची सजावट आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचं दर्शन घडलं. या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल वाजवणारी मराठमोळी महिला आणि गणेशाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार पहायला मिळाले. Republic Day Parade 2026
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे भव्य दर्शन
गणपती बाप्पाच्या मन मोहून टाकणाऱ्या रूपासह महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे भव्य दर्शन घडले. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच केंद्रीय कॅबिनेट मंत्री पियुष गोयल आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी उभे राहिले. एकूणच या चित्ररथात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि गणेशोत्सवाचा उत्सव साकारण्यात आला आहे. मूर्तीकार, सजावट यातून मिळणारा रोजगार आणि होणार आर्थिक उलाढाल हा विषय या चित्ररथातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.






