Marathi News

पाकिस्तान विरोधात शिवसेनेचे मुंबईत आक्रमक आंदोलन, काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

Written by:Astha Sutar
Published:
पाकिस्तानविरोधात केंद्र सरकार आणि लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला. निरपराधांचे बळी घेणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा केंद्र सरकारकडून बिमोड केला जाईल.
पाकिस्तान विरोधात शिवसेनेचे मुंबईत आक्रमक आंदोलन, काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

मुंबई – मंगळवारी काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. मुंबईतील मालाडमधील शांताराम तलाव, कुरार विलेज येथे शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद…, पाकिस्तान मुर्दाबाद… अशी घोषणाबाजी दिली. तसेच दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले.

दहशतवाद्यांचा बिमोड केला जाईल…

भारतातील निष्पाप नागरिकांना दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या घातल्या आणि ठार मारले. यातून दहशतवादाचा सर्वात क्रूर चेहरा समोर आला. पाकिस्तानविरोधात केंद्र सरकार आणि लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला. निरपराधांचे बळी घेणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा केंद्र सरकारकडून बिमोड केला जाईल. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. लष्कर ए तोयब्बाला धडा शिकवायला हवा. या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये घुसून मारायला हवे, असा संताप निरुपम यांनी व्यक्त केला.

शिवसेनेकडून काश्मीरात निषेध मोर्चा…

एकिकडे देशात आणि राज्यात या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येत असताना, दुसरीकडे आज काश्मीरमधी गुमत बाजारात  शिवसेना (शिंदे) गटाकडून एक निषेध रॅली आयोजित केली होती. ज्यामध्ये पहेलगाम येथे निष्पाप पर्यटकांच्या हत्येविरोधात निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी झाले होते. या निषेध मोर्चेाचे नेतृत्व शिवसेना प्रदेश प्रमुख अश्विनी गुप्ता यांनी केले. त्यांनी आपल्या निवेदनात भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आणि काश्मीरमधील पर्यटक आणि अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी यावेळी केली. दरम्यान, सोपोर, श्रीनगर, उधमपूर, रियासी, कटरा इत्यादी अनेक ठिकाणी शिवसेनेनेही अशीच निदर्शने केली. शिवसेनेसह विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांनी जम्मूतील पुकारलेल्या बंदला प्रतिसाद दिला. आज जम्मूमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews