बँकॉक- थायलंड देशाची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये बौद्ध मठाशी संबंधित सेक्स स्कँडलचा पर्दाफाश झाला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर 9 बौद्ध भिख्खूंची मठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर या प्रकरणात 100 कोटींपेक्षा जास्त जैसे लुबाडले गेल्याचंही समोर आलंय.
या प्रकरणातील महिला आरोपी विलावन एम्सावत ही बौद्ध भिख्खूंशी शरीरसंबंध ठेवत होती. त्यानंतर ब्लॅकमेलिंगमध्ये या महिलेनं 385 मिलियन बाथ म्हणजेच सुमारे 102 कोटी रुपयांची खंडणी या भिख्खूंकडून उकळली होती.
हे ही वाचा
नेमकं काय आहे प्रकरण?
बँकॉकमध्ये असलेल्या बौद्ध मठातील वरिष्ठ भिख्खू फ्रा थेप वचिरापामोक हे जूनमध्ये बेपत्ता झाले. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस मिस गोल्फ नावाच्या महिलेच्या घरी पोहचले. या महिलेची ओळख विलावन एम्सावत अशी निघाली. पोलिसांनी विलावनच्या मोबाईलची तपासणी केली असता या महिलेचे फ्रा थेप वचिरापामोक यांच्यासह अन्य भिख्खूंसोबत 80 हजार अश्लील फोटो आणि व्हिडीओ सापडले.
हे प्रकरण समोर आल्यानंतर विलावन या आरोपी महिलेला मनी लाँड्रिंग आणि खंडणीप्रकरणात अटक करण्यात आली आहे. साधूंना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून विलावन त्यांना ब्लॅकमेल करत होती. धमकी देऊन या भिख्खूंकडून मोठ्या रकमा तिनं उकळल्याची माहिती आहे.
फ्रा थेप वचिरापामोक या भिख्खूंच्या मुलाची आई असल्याचा दावा विलावन हिनं केला आहे. या मुलाच्या देखभालीसाठी 1.90 कोटी रुपयांची मागणी त्यांच्याकडे केली होती, असं या महिलेनं सांगितलंय.
केवळ एका भिख्खूशी संबंध, विलावनचा दावा
पोलिसांच्या तपासात इतर भिख्खूंकडूनही मोठ्या रकमा विलावनला ट्रान्सफर झाल्याचं समोर आलं आहे. या महिलेला महागडी गिफ्ट्स, मर्सिडिज बेंझही भेट देण्यात आली होती. विलावननं यातील बराचसा पैसा ऑनलाईन जुगारात उडवल्याचंही समोर आलंय. अटकेत असलेल्या विलावननं मात्र एकाच भिख्खूसोबत संबंध असल्याचा दावा केला आहे. त्याबरोबरच भिख्खूलाच पैसे दिले असा दावाही तिनं केलाय.
ब्रह्मचार्याची शपथ घेतात भिख्खू
या घटनेनंतर थाडलंडमध्ये बौद्ध समाजात खळबळ उडाली आहे. बौद्ध भिख्खू हे धर्मातील मानाचं आणि महत्त्वाचं पद असतं. ब्रह्मचार्याशी शपथ घेऊन ते जगाच्या भोगवादी वातावरणापासून लांब राहत असतात. त्यामुळं ते श्रद्धेय असतात. या घटनेनंतर थाडलंडच्या हंगामी पंतप्रधानांनी भिख्खूंच्या व्यवहारांची आणि मंदिर-मठांच्या आर्थिक व्यवस्थेशी संबंधित कायद्यांची समीक्षा करण्याचे आदेश दिले आहेत. तसचं मठ-मंदिरातील नियमांची समीक्षाही करण्यात येणार आहे.