लडाखमधून मोठी बातमी समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. लेह पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सोनम वांगचुक यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. लेह हिंसाचारानंतर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. त्यांना तुरुंगात हलवायचे की इतर व्यवस्था करायची याचा निर्णय घेतला जात आहे. वांगचुक यांच्यावर केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करणाऱ्या निदर्शकांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या दरम्यानच्या काळात लडाखमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता. यामध्ये काही नागरिकांनी जीव देखील गमावला होता.
सोनम वांगचूक अटकेत; लडाखमध्ये तणाव
हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाख एनजीओची एफसीआरए नोंदणी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वांगचुक यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामुळे लडाखमधील तरुण रस्त्यावर आले होते. ते तरुण हिंसक झाले होते. त्यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये वाद होऊन हिंसा उसळली. त्यात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झालेत. त्यानंतर केंद्र सरकारने या हिंसेप्रकरणी वांगचुक यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.
हे ही वाचा
लडाखमधील तणाव आणि संघर्षाचे कारण काय?
लडाख केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी आणि राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये या प्रदेशाचा समावेश करण्याच्या मागणीसाठी लेहमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार झाला. वांगचुक यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे जमावाने भाजप कार्यालय आणि सरकारी मालमत्तेवर हल्ला केल्याचा आरोप आहे. 24 सप्टेंबर रोजी झालेल्या संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला आणि 90 जण जखमी झाले. हिंसक संघर्षानंतर लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला. पोलीस आणि निमलष्करी दलांनी कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली. आतापर्यंत 50 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लडाखचे केंद्रशासित प्रदेश म्हणून झालेले पुनर्गठन. जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून लडाख स्वतंत्र प्रशासनाखाली आणले गेले, परंतु त्यामध्ये स्थानिक जनतेच्या प्रतिनिधित्वाचा अभाव असल्याने असंतोष निर्माण झाला. रोजगार, शिक्षण, उद्योग आणि संसाधनांवर नियंत्रण या विषयांवर लोकांमध्ये नाराजी आहे. पर्यावरणीय समस्याही तणाव वाढवतात. हिमालयीन भागातील हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि चराईच्या जमिनीवरील अतिक्रमण यामुळे शेतकरी व भटक्या समाजात संघर्ष होतो. तसेच स्थानिक संस्कृती आणि ओळख जपण्याची चिंता नागरिकांमध्ये कायम आहे.
पर्यटन व संरक्षणासंबंधीचे निर्णय स्थानिकांच्या मतांशिवाय घेतले जातात, हेही संघर्षाचे एक कारण आहे. स्थानिक संघटना व नेते विशेष संवैधानिक हक्क, सहाव्या अनुसूचीप्रमाणे संरक्षण आणि संसाधनांवरील हक्क यासाठी सातत्याने मागणी करत आहेत.थोडक्यात, लडाखमधील संघर्ष हा सीमावाद, राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव, पर्यावरणीय आव्हाने आणि स्थानिकांच्या ओळखीच्या जपणुकीच्या लढ्यामुळे उद्भवलेला आहे.