वॉशिंग्टन डीसी – शांततेचं नोबेल मिळालं नाही म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ग्रीन लँडवर कब्जा करण्याचं ठरवलंय. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांना पत्र लिहून ट्रम्प यांनी नोबेल न मिळाल्याची तक्रार केलीय. आता यापुढे अमेरिकेच्याच हिताचा विचार करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर नोबेल पुरस्कार देश देत नाही तर समिती देते असं प्रत्युत्तर नॉर्वेच्या पंतप्रधानांनी दिलंय.
नोबेलवरुन ट्रम्प यांचा संताप
शांततेचं नोबेल मिळालं नसल्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. या संतापात ग्रीन लँडवर कब्जा करण्याची मोहीमच ट्रम्प यांनी हाती घेतलीय
त्यापूर्वी नॉर्वेचे पंतप्रधान नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांना पत्र लिहून ट्रम्प यांनी नोबेल न मिळाल्याची तक्रार केलीय
ट्रम्प यांच्या पत्रात काय?
१. 8 युद्धे थांबवूनही त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात आले नाही.
२. आता केवळ शांततेबद्दल विचार करणार नाही
३. शांतता आवश्यक आहे, परंतु आता ते अमेरिकेच्या हितासाठी काय योग्य आहे याचा विचार करणार
4. जोपर्यंत ग्रीनलँडवर आमचे पूर्ण नियंत्रण येत नाही, तोपर्यंत जग सुरक्षित नाही
ट्रम्प यांनी पत्रात हेही स्पष्ट केलंय की डेन्मार्क रशिया किंवा चीनपासून ग्रीन लँडचे रक्षण करु शकत नाही.
यातून डेन्मार्कच्या ग्रीन लँडवरील मालकीवरच ट्रम्प यांनी सवाल उपस्थित केले आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील देशांची लष्करी युती म्हणजेच नाटोनं या प्रकरणात पुढे येऊन अमेरिकेला ग्रीनलँड मिळवून देण्यासाठी मदत करावी, असं आवाहनही ट्रम्प यांनी केलंय.
युरोपातील देशांचा ट्रम्प यांना विरोध
दुसरीकडे युरोपातील आठ देशांनी ट्रम्प यांच्या ग्रीन लँड मोहिमेला विरोध दर्शवला आहे. युरोपमधील या 8 देशांवर अमेरिकेनं 10% टेरिफ लावलंय. 1 फेब्रुवारीपासून हा नवा टेरिफ आकरण्यात येणार आहे. ग्रीनलँडबाबत अमेरिकेशी कोणताही करार झाला नाही, तर 1 जूनपासून हे शुल्क वाढवून 25 ते २०० टक्के केले जाईल, असा इशाराही देण्यात आलाय.
युरोपातील या 8 देशावर टेरिफ
1. डेन्मार्क
2. नॉर्वे
3. स्वीडन
4. फ्रान्स
5. जर्मनी
6. इंग्लंड
7. नेदरलँड्स
8. फिनलंड 1 फेब्रुवारीपासून शुल्क लागू होईल.
त्यांनी इशारा दिला की, जर ग्रीनलँडबाबत अमेरिकेशी कोणताही करार झाला नाही, तर 1 जूनपासून हे शुल्क वाढवून 25% केले जाईल. यापूर्वी ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये एका बैठकीदरम्यान या देशांवर शुल्क लावण्याची धमकी दिली होती.
नॉर्वेच्या पंतप्रधानांचं ट्रम्प यांना उत्तर
दुसरीकडे नॉर्वेच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांना पत्र लिहून नोबेल पुरस्काराशी देशाच्या सरकारचा संबंध नसल्याचं सांगितलंय.
१. नोबेल पुरस्कार समिती देते नॉर्वे सरकार देत नाही
२. ट्रम्प यांनी याबाबत पत्र लिहून तक्रार केली आहे
अमेरिकेनं जर ग्रीनलँडवर हल्ला केला तर यामुळे युरोपातील राष्ट्र आणि नाटो संघटनेची संघर्ष होण्याची शक्यता आहे
ग्रीनलँड का महत्त्वाचे?
ग्रीनलंडसाठी डोनाल्ड ट्रम्प इतके आग्रही का आहेत हेही जाणून घेऊयात.
१. ग्रीनलंडचे भौगोलिक स्थान-
उत्तर अमेरिका आणि युरोपच्या मध्ये म्हणजेच अटलांटिक महासागराच्या मध्यभागी ग्रीनलँड
मिड-अटलांटिक प्रदेशात एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण
२.सामरिक लष्करी महत्त्व:
ग्रीनलंड युरोप आणि रशियादरम्यान लष्करी आणि क्षेपणास्त्र निरीक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं
या ठिकाणी अमेरिकेचा थुले एअर बेस
रशिया, चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक
३. नैसर्गिक संसाधनं:
ग्रीनलंडमध्ये दुर्मिळ खनिजं, तेल, वायूंचे साठे
भविष्यात आर्थिक आणि तांत्रिक महत्त्व
४. नवीन सागरी व्यापारी मार्ग:
जागतिक तापमानवाढीमुळे आर्क्टिकमधील बर्फ वितळत आहे, ज्यामुळे नवीन सागरी मार्ग खुले होत आहेत. ग्रीनलंडचे नियंत्रण अमेरिकेला या मार्गांवर वर्चस्व मिळवण्यासाठी आवश्यक
जगात नवा संघर्ष उफाळणार?
अमेरिका ग्रीनलँडला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेची “फ्रंट लाइन” मानतो. तिथे प्रभाव वाढवून तो भविष्यातील संभाव्य धोके आधीच रोखू इच्छितो. ट्रम्प यांच्या ग्रीनलँड मोहिमेमुळे युरोपीय राष्ट्र विरुद्ध अमेरिका असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. यात रशिया आणि चीननं जर युरोपीय राष्ट्रांची मदत केली तर जगात मोठा संघर्ष येत्या काळात उद्भवण्याची शक्यता आहे.





