Marathi News

भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग कायम, पाकिस्तानची चारी बाजूनी कोंडी, युद्धावर अमेरिकेची भूमिका काय?

Written by:Astha Sutar
Published:
पाकिस्तानचे हवाई हल्ले भारताने उधळून लावले..., जशास तसे उत्तर दिले त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झालेले आहे. आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच पाकिस्तानी लष्कराचे लष्करप्रमुख मुनीर यांना हटवण्याच्या हालचाली सुरु आहेत.
भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग कायम, पाकिस्तानची चारी बाजूनी कोंडी, युद्धावर अमेरिकेची भूमिका काय?

India Pakistan War – पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने सर्व प्रयत्न हाणून पाडले. भारताने पाकचे हल्ले उधळून लावले. गुरुवारी रात्री भारताने पाकिस्तानमधील ११ शहरांवर हल्ला केला आहे. भारताच्या S-400 यंत्रणाने पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. यानंतर पाकिस्तानचे चारी बाजूनी कोंडी होताना दिसत आहे.

पाकिस्तानची चारी बाजूनी कोंडी…

दरम्यान, पाकचे सर्व ड्रोन हल्ले भारताने परतावून लावले आहेत. मात्र रात्री पाकिस्तानच्या मदतीसाठी तुर्कस्तान धावला होता. रात्री तुर्कस्तानचे काही मालवाहू विमान हे पाकिस्तानच्या मदतीला गेले होते. तर दुसरीकडे बलुचिस्तान यांनीही या युद्धाला विरोध केला असून, तिकडे पाकिस्तानच्या या भूमिकेवरून बलुचिस्तान आंदोलन करत आहे. पाकिस्तानचे हवाई हल्ले भारताने उधळून लावले…, जशास तसे उत्तर दिले त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झालेले आहे. आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच पाकिस्तानी लष्कराचे लष्करप्रमुख मुनीर यांना हटवण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे पाकिस्तानची चारही बाजूनी कोंडी झालेली दिसत आहे.

एस जयशंकर यांचा अमेरिकेला फोन…

भारताचे परराष्ट्रमंत्री यांचा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री यांना फोन केला असून, या युद्धात आधीच अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला आहे. फोनवरुन सर्व माहिती दिलेली आहे. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवून परिस्थिती नियंत्रणात… परिस्थिती चिघळू देऊ नका, असे म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराण, कझाकिस्तान, अमेरिका, युरोपातले विविध देश, इटली अशा देशांच्या प्रतिनिधी, अध्यक्ष, पंतप्रधानांशी एस. जयशंकर यांनी फोनवरुन संवाद साधला आहे. आम्ही दहशतवादविरोधी कारवाई केली आहे. पण पाकिस्तानने कुठलंही पाऊल उचललं तर त्याला तिथल्या तिथे उत्तर दिलं जाईल. फोनवरुन एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews