ऑनलाईन गेमिंगमुळे नवव्या मजल्यावरुन उडी मारुन तीन बहिणींची आत्महत्या, पालकांचं मुलांवर लक्ष आहे का?

Written by:Smita Gangurde
Published:
पालकांनी आपली मुलं काय गेम खेळतात याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होतेय. यापूर्वीही ब्ल्यू व्हेल गेममुळे अनेक मुलांनी आपले प्राण गमावले होते. २०१७ साली या सुसाईड गेमवर देशात बंदी घालण्यात आलीय. या बंदीनंतरही कोरियन लव्ह गेमसारखे ऑनलाईन गेम उपलब्ध असल्याचं दिसतंय
ऑनलाईन गेमिंगमुळे नवव्या मजल्यावरुन उडी मारुन तीन बहिणींची आत्महत्या, पालकांचं मुलांवर लक्ष आहे का?

गाझियाबाद- मोबाईल गेमिंगच्या नादात तीन बहिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडलीय. ऑनलाईन गेमिंगच्या धोक्यांचा मुद्दा या घटनेमुळं पुन्हा ऐरणीवर आलाय. पालकांचं मुलांकडे लक्ष आहे का, असा सवालही या निमित्तानं विचारण्यात येतोय.

गाझियाबादच्या याच भारत सीटी टॉवरमध्ये नवव्या मजल्यावरुन उडी मारत तीन बहिणींनी आत्महत्या केलीय. निशिका, प्राणी आणि पाखी अशी या तिन्ही बहिणींची नावं असून त्यांचं वय १२ ते १६ सालापर्यंत होतं. या तिन्ही मुलींच्या पित्याचं नाव चेतन असं असून त्यांनी दोन लग्न केली होती. गाझियाबादच्या या टॉवरमध्ये तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये चेतन, त्यांच्या दोन पत्नी आणि एकूण चार मुलं राहत होती.या घरातील एका खोलीत या तीन मुलींचा वावर कायम असेल

ऑनलाईन गेमिंगच्या बळी

तिन्ही बहिणींना गेल्या 3 वर्षांपासून ऑनलाईन गेमिंगची सवय होती. तिन्ही बहिणी एकत्र कोरियन लव्ह गेम सतत खेळत असत. गेल्या 2 वर्षांपासून ऑनलाईन गेमिंगसाठी शाळाही सोडली. 14 वर्षांची प्राची या गेममध्ये डेथ कमांडरच्या भूमिकेत असत होती. प्राची तिच्या दोन्ही बहिणींना टास्क देत होती, इतर दोघी तिचं ऐकत असत. घरात आई-वडिलांशी आणि शेजाऱ्यांचीही बोलत नसत. कोरियात जाण्याची तिन्ही बहिणींची होती इच्छा होती. तिन्ही बहिणी सातत्यानं एकत्रच राहायच्या. वडिलांनी गेम खेळण्यास मनाई केल्यानंतर या तिघींनी मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या खोलीच्या बाल्कनीतून उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधी त्यांनी एक डायरी रुममध्ये ठेवली आहे. त्यात सुसाईड नोट लिहलिय.

काय आहे सुसाईड नोटमध्ये?

सॉरी पप्पा, आम्ही गेम सोडू शकत नाही. कोरियन गेम आमचं जगणं आहे, सारं काही आहे. आता तुम्हाला कळेल की आमचं या गेमवर किती प्रेम आहे.
तिन्ही मुलींच्या एकत्र जाण्याचा मोठा धक्का कुटुंबाला बसलाय. तीन मुलींच्या आत्महत्येनंतर मुलींचे पिता चेतन यांनी पालकांनी मुलांना मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळायला देऊ नका, असं आवाहन केलंय.

मध्यरात्री खोली आतून बंद करुन या तिन्ही मुलींनी आत्महत्या केली. सोसायटीतील लोकांच्या आवाजानं आई-वडिलांना जाग आली. त्यांनी दरवाजा तोडला, मात्र खोलीत कुणीही नव्हतं. त्यानंतर या तिघींना रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांना मृत घोषित केलं. या तिन्ही बहिणींच्या आत्महत्येनं कोरियन लव्ह गेम चर्चेत आलाय.

काय आहे कोरियन लव्ह गेम?

१. इंटरनेटवर ऑनलाईन चॅट सिस्टिम
२. कोरियन सांगून गेमवर करण्यात येतं संभाषण
३. सोशल मीडिया आणि मेसेजिंगमधून प्रसार
४. गेममध्ये प्राथमिक पातळीवर मैत्री आणि प्रेमाचे संदेश
५. सुरुवातीला सोपे सोपे टास्क देण्यात येतात
६. पुढे मोठे टास्क आणि मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न
७. ऐकलं नाही तर धमक्या, खेळणारी व्यक्ती तणावात

पालकांचं मुलांवर लक्ष आहे का?

अशा गेमिंगमधून खेळणाऱ्या मुला-मुलीवर संमोहन करण्यात येत असल्याचंही तज्ज्ञ सांगतायेत. यातूनच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत मजल जातेय. त्यामुळेच पालकांनी आपली मुलं काय गेम खेळतात याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होतेय. यापूर्वीही ब्ल्यू व्हेल गेममुळे अनेक मुलांनी आपले प्राण गमावले होते. २०१७ साली या सुसाईड गेमवर देशात बंदी घालण्यात आलीय. या बंदीनंतरही कोरियन लव्ह गेमसारखे ऑनलाईन गेम उपलब्ध असल्याचं दिसतंय. त्यामुळं अशा टोकाच्या घटना रोखण्यासाठी मुलांशी संवाद राखण्याची आणि त्यांच्या मोबाईल, गेमिंगवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होतेय.

Follow Us :GoogleNews