टिव्हिएस ज्युपिटर ईव्ही लाँच; अवघ्या 15 हजारात तुमची गाडी करा बुक…अशी आहे प्रक्रिया

Written by:Rohit Shinde
Published:
काही दिवसांपूर्वी TVS कंपनीने आपल्या लोकप्रिय Jupiter स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट 2025 ऑटोमोबिलिटी इव्हेंटमध्ये सादर केले होते. आपण TVS Jupiter Electric स्कूटरची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
टिव्हिएस ज्युपिटर ईव्ही लाँच; अवघ्या 15 हजारात तुमची गाडी करा बुक…अशी आहे प्रक्रिया

जशी सध्या देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे, तशीच वाहन कंपन्याही दररोज नवनवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत. आता त्यात आणखी एका दमदार स्कुटीची भर पडली. या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी TVS कंपनीने आपल्या लोकप्रिय Jupiter स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट 2025 ऑटोमोबिलिटी इव्हेंटमध्ये सादर केले होते. आता ती लवकरच अधिकृतपणे लाँच होणार आहे. आपण TVS Jupiter Electric स्कूटरची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

30 मिनिटांत चार्ज

ही स्कूटर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फक्त 30 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते. हे या गाडीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल, शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील नोकरदार वर्गाला ही गाडी विशेष फायद्याची ठरू शकते, असं सांगितलं जात आहे.

गाडीची इतर वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.44kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर तब्बल 200 किमीची रेंज देते. त्याचबरोबर, यामध्ये 4 किलोवॅट पीक पॉवर निर्माण करणारी BLDC मोटर दिली आहे, जी या स्कूटरला 85 किमी/तास टॉप स्पीड मिळवून देते.

15 हजारांत बुकींग शक्य

ही स्कूटर सुमारे ₹85,000 ते ₹95,000 (एक्स-शोरूम) दरम्यान असणार आहे. 2025 च्या अखेरीस ही स्कूटर बाजारात येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला तुम्ही फक्त ₹15,000 भरून ही स्कूटर बुक करू शकता आणि उर्वरित रक्कम फायनान्स करून मासिक हप्त्यांमध्ये फेडू शकता. ही TVS Jupiter Electric स्कूटर इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठी गेमचेंजर ठरू शकते. त्यामुळे तुम्ही सुध्दा जर एखादी दमदार ईव्ही स्कुटी घेण्याच्या विचारात असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.