वैष्णोदेवी यात्रा (Vaishno Devi IRCTC Tour Package) ही जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा पर्वतावर असलेल्या माता वैष्णोदेवीच्या मंदिराकडे जाणारी एक पवित्र आणि आव्हानात्मक यात्रा आहे. मात्र तरीही दरवर्षी लाखो करोडो भाविक वैष्णोदेवीला जात असतात आणि देवीचे आशीर्वाद घेत असतात. जर तुम्ही सुद्धा माता वैष्णोदेवीला भेट देण्याची योजना आखत असाल आणि परवडणारे आणि आरामदायी प्रवास पॅकेज शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने सर्वसामान्य भक्ताला परवडेल अशा किमतीत एक विशेष टूर पॅकेज लाँच केले आहे.
कुठून सुरू होईल यात्रा – Vaishno Devi IRCTC Tour Package
आयआरसीटीसीने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर या टूर पॅकेजबद्दल माहिती शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले क, तुम्ही या आयआरसीटीसी पॅकेजसह तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरू करू शकता. ही यात्रा दिल्लीपासून सुरू होईल आणि भक्तांना त्यांच्या सोयीनुसार अनेक पर्याय उपलब्ध होतील. Vaishno Devi IRCTC Tour Package
टूर पॅकेज पर्याय आणि किंमती
१. ४ दिवस/३ रात्री : किमती प्रति व्यक्ती ६,९९० ते ८,४२० रुपयांपर्यंत आहेत.
२. वंदे भारत विशेष पॅकेज (२ दिवस / १ रात्र): किमती ७,३६० पासून सुरू होतात.
वारंवार निघण्याच्या सोयीमुळे, प्रवासी त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या सहलीचे नियोजन करू शकतात.
आयआरसीटीसीने ४ दिवस आणि ३ रात्रीच्या पॅकेजसाठी (माता वैष्णोदेवी एक्स दिल्ली – आठवड्याचा दिवस) सविस्तर किंमत यादी देखील जारी केली आहे, जी रविवार ते गुरुवार प्रवासासाठी लागू आहे:
कसे बुक करावे?
आयआरसीटीसीने भाविकांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचे बुकिंग करण्यासाठी त्यांच्या पर्यटन वेबसाइट, आयआरसीटीसी टुरिझम वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले आहे. प्रवासी त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या सहलीचे नियोजन आणि बुकिंग करण्यासाठी अधिक माहितीसाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत पर्यटन वेबसाइटला भेट देऊ शकतात. माता वैष्णोदेवी यात्रेशी संबंधित इतर टूर पॅकेजेसची तपशीलवार माहिती आयआरसीटीसी वेबसाइट किंवा त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (एक्स) देखील उपलब्ध आहे.




