Marathi News

एकनाथ शिंदे-अमित शहा यांच्या भेटीत काय घडले? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा ‘एनडीए’ला पाठिंबा, या कारणासाठी…

Written by:Astha Sutar
Published:
माधुरी हत्तीणबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार आहे. यात राज्य सरकार आणि वनतारा पक्षकार होतील. या प्रकरणी जनभावना लक्षात घेत सरकार त्याचा आदर करेल, असे शिंदे म्हणाले.  
एकनाथ शिंदे-अमित शहा यांच्या भेटीत काय घडले? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा ‘एनडीए’ला पाठिंबा, या कारणासाठी…

Eknath Shinde – कालपासून शिवसेनेच मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दीर्घकाळ गृहमंत्रीपदाचा विक्रम करणाऱ्या अमित शाह यांची शिंदेंनी भेट घेत अभिनंदन केले. यावेळी शहांसोबत दिर्घ चर्चा केली. तसेच भेटीत शिंदेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एनडीए स्थापन होण्यापूर्वीपासून शिवसेना आणि भाजपची युती आहे. ‘एनडीए’मधील सर्वात जुना आणि विश्वासार्ह मित्र म्हणून शिवसेनेची ओळख आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

एनडीएला भक्कमपणे पाठिंबा…

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपा युतीला २५ वर्ष पूर्ण झाली. याबाबत ‘एनडीए’ची मंगळवारी बैठक पार पडली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा एनडीएला भक्कम पाठिंबा असेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून यश मिळालं, त्याप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एनडीएच्या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. दिल्लीत खासदारांना भेटलो, आपण लपूनछपून काही करत नाही, असा टोला शिंदेंनी उबाठाला लगावला.

सहकारापासून समृद्धीचा ध्यास…

दुसरीकडे ३७० कलम रद्द करून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा करणारे, देशातील नक्षलवादाचा बीमोड करणारे आपण सक्षम गृहमंत्री आहेत. देशाच्या इतिहासात सलग २,२५८ दिवस सेवा देणारे अमित शाहजी पहिले गृहमंत्री ठरले. यानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. असं शिंदे म्हणाले. सहकारापासून समृद्धीचा ध्यास घेत देशाच्या प्रगतीचा निर्धार करणारे कार्यकुशल, दृढ निश्चयी नेते अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews