‘नोबेल समितीचं शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य…’; व्हाईट हाऊसमधून पहिली प्रतिक्रिया समोर…

Written by:Rohit Shinde
Published:
नोबेल पुरस्कार ट्रम्प यांना न मिळू शकल्याने आता व्हाईट हाऊसमधून प्रतिक्रिया समोर येत आहेत. नोबेल समितीने शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिल्याची टीका करण्यात आली आहे.
‘नोबेल समितीचं शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य…’; व्हाईट हाऊसमधून पहिली प्रतिक्रिया समोर…

नोबेल शांतता पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. नोबेल समितीने व्हेनेज्युएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना माचाडो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. मी भारत-पाकिस्तान युद्धासह सात युद्धे थांबवली आहेत, त्यामुळे हा पुरस्कार मला मिळावा असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांना हा पुरस्कार मिलालेला नाही. या घटनेची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. अशातच आता व्हाईट हाऊसमधून प्रतिक्रिया समोर आली आहे.

व्हाईट हाऊसमधून प्रतिक्रिया समोर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल जाहीर झाला नसल्यानं व्हाइट हाऊसनं थेट नॉर्वेच्या नोबेल समितीवर टीका केली. डोनाल्ड ट्रम्प यांचे सहायक आणि व्हाइट हाऊसमधील अधिकारी स्टीवन चेऊंग यांनी नोबेल समितीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. ते म्हणाले, “अध्यक्ष ट्रम्प शांतता करार, युद्ध थांबवणं आणि जीव वाचवणं सुरु ठेवतील. त्यांचं ह्रदय मानवतेचं असून इच्छाशक्तीच्या जोरावर पर्वत हलवू शकणारं त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही. नोबेल समितीनं ते शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिल्याचं सिद्ध केलं. ” अशा शब्दांत नोबेल समितीच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली आहे.

मारिया कोरिना माचाडोंना शांततेचा नोबेल पुरस्कार

यंदा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 338 व्यक्ती किंवा संस्थांचे नामांकन आले होते. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील नाव होतं. मात्र, मारिया यांनी पुरस्काराच्या शर्यतीत ट्रम्प यांना मागे टाकत शांततेच्या नोबेल पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. मारिया कोरिना मचाडो यांना व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्ग निवडला. त्यांनी केलेल्या शांततापूर्वक संघर्षासाठी 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याचा येणार आहे, असे नोबेल समितीने सांगितले. त्यामुळे सध्या जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews