एक्सप्रमाणे एलन मस्क आता रयानएयर खरेदी करणार? स्टारलिंक इंटरनेट घेण्यास नकार दिल्यानं मस्क संतापले

Written by:Smita Gangurde
Published:
ट्विटर खरेदी करतानाही मस्क यांनी सुरुवातीला त्यावेळच्या कंपनीच्या कारभारावर आणि कंपनीचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांच्या निर्णयावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्याचं नावही त्यांनी एक्स असं केलं. आता रयानएयरच्या बाबतीतही हेच घडणार का, हे पाहावं लागणार आहे.
एक्सप्रमाणे एलन मस्क आता रयानएयर खरेदी करणार? स्टारलिंक इंटरनेट घेण्यास नकार दिल्यानं मस्क संतापले

वॉशिंगटन डी सी – स्टारलिंकचं इंटरनेट कनेक्शन घ्यायला नकार दिला म्हणून रयानएयर एयरलाईन्स खरेदी करण्याचा विचार एलन मस्क करतायेत. त्यांनी एक्सवरुन याबाबत जनतेला कौल मागितलाय. या वादातून रयाएनएयरचे सीईओ आणि एलन मस्क यांच्यात शब्दांचं युद्धही रंगलंय.

मस्क यांनी एक्सवर विचारला प्रश्न

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, ट्विटर म्हणजेच एक्सचे मालक एलन मस्क यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन एक प्रश्न विचारुन त्याबाबतची मतं मागवली आहेत. मस्क यांनी युरोपातील बजेट एयरलाईन्स अशी ओळख असलेली रयानएयर खरेदी करावी का, असा प्रश्न विचारलाय. याला 76 टक्के लोकांनी हो आणि 24 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलंय.

मस्क का संतापले?

मस्क यांनी संतापातून एयरलाईन्स खरेदी करण्याचा विचार सुरु केल्याचं सांगण्यात येतंय.
1. रयानएयरच्या विमानत स्टारलिंक इंटरनेट लावण्यास सीईओंचा नकार
२. स्टारलिंक ही एलन मस्क यांची इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी
३. विमानावरील एन्टिनामुळे वजन वाढेल आणि इंधन खर्च 2 टक्क्यांनी वाढण्याचे कारण
४. एयरलाईनचे सीईओ मायकल ओलेरी यांनी मस्क यांना मुर्ख म्हणत केली टीका
५. ओलेरी महामुर्ख असल्याचं एलन मस्क यांचं प्रत्युत्तर
६. सीईओ ओलेरींना कंपनीतून काढून टाकायला हवं-मस्क
७. रयानएयर कंपनी खरेदी केली तर किती किंमत, मस्क यांची विचारणा

या सगळ्या वादामुळे आता मस्क रयानएयर खरेदी करणार, याची चर्चा रंगलीय.

रयानएयर एयरलाईन्स किती मोठी?

1. युरोपातील सर्वात स्वस्तातील एयरलाईन्स म्हणून परिचित
2. डच लुफ्तांसापेक्षा तीन पट मोठी एयरलाईन्स
3. एयरलाईव्सची किंमत 30 अब्ज ब्युरो म्हणजेच 2.70 लाख कोटी
4. सीईओ मायकल ओलीरी हे टॉप 10 शेअरहोल्डर्सपैकी एक
5. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 55 टक्क्यांची वाढ

एक्सनंतर आता एयरलाईन्सची खरेदी करणार

रयानएयरची सध्याची किंमत २.७० लाख कोटी असली तरी एलन मस्क यांची संपत्ती ७० लाख कोटींची आहे.
त्यामुळे एलन मस्क कधीही याबाबतचा निर्णय करु शकतात. ट्विटर खरेदी करतानाही मस्क यांनी सुरुवातीला त्यावेळच्या कंपनीच्या कारभारावर आणि कंपनीचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांच्या निर्णयावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्याचं नावही त्यांनी एक्स असं केलं.
आता रयानएयरच्या बाबतीतही हेच घडणार का, हे पाहावं लागणार आहे.

 

 

Follow Us :GoogleNews