Car Sitting Business : गाडीत एक तास बसून राहण्याचे 3500 रुपये, तरुणीने शोधला नवा बिझनेस, काय आहे कार सिटिंग व्यवसाय?

Written by:Smita Gangurde
Published:
गाडीत एक तास बसण्याचे 3500 रुपये तुम्हाला कुमी दिले तर.. तुमचा विश्वास बसणार नाही पण अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक तरुणी यातून हजारो रुपये कमावतेय.
Car Sitting Business : गाडीत एक तास बसून राहण्याचे 3500 रुपये, तरुणीने शोधला नवा बिझनेस, काय आहे कार सिटिंग व्यवसाय?

गाडीत एक तास बसण्याचे 3500 रुपये तुम्हाला कुमी दिले तर.. तुमचा विश्वास बसणार नाही पण अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक तरुणी यातून हजारो रुपये कमावतेय. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये राहणारी ही तरुणी दिवसाला कारमध्ये बसून हजारो डॉलर्स कमावतेय. सिडनी शार्लोट असं या तरुणीचं नाव असून कार सिटिंगचा व्यवसाय तिनं सुरु केलाय. केवळ तास ते दीड तास कारमध्ये बसण्याचे ती 50 डॉलर्स घेते आहे.

काय आहे कार सिंटींगचा व्यवसाय?

1. रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसून राहणे हा व्यवसाय
२. न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर पार्किग कार टो केली तर 65 डॉलर्स म्हणजेच 4500 रुपयांचा दंड
3. गाडीत ड्रायव्हर असेल तर गाडी टो करण्यात येत नाही.
4. कार सिंटिग करणाऱ्या व्यक्तीमुळे पार्किंगच्या दंडातून सुटका
5. तास किंवा दीड तास कारमध्ये बसून राहण्यासाठी मिळतात 50 डॉलर्स, म्हणजे 3500 रुपये

कशी सूचली ही कल्पना?

सिडनी आता या व्यवसायातून हाजरो डॉलर्स कमवते आहे. ती 20 हून जास्त क्लायंट्सच्या कारची काळची घेते. न्यूयॉर्कमध्ये अल्टरनेट स्ट्रीट पार्किंगचा नियम आहे. यानुसार दर आठवड्याला वाहने रस्त्याच्या एका बाजूवरुन दुसऱ्या बाजूला हलवावी लागतात. हेही काम सिडनी करतेय. सिडनी शार्लोट ही मार्केंटिंगची नोकरी करत होती, गेल्या वर्षी तिची नोकरी गेल्यानंतर काय करायचं असा प्रश्न तिच्यापुढं उभा राहिला. घराच्या भाड्याचा प्रश्न आणि दररोजच्या खर्चाचं करायचं काय असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला, त्यातून कार सिटींगची कल्पना तिला सुचली. आता या व्यवसायात ती स्थिरस्थावर झालीये. इतकंच नाही तर रोजगाराची एक नवी संधी आणि नवं क्षेत्र तिनं न्यूयॉर्कसारख्या शहरात निर्माण केली.

Follow Us :GoogleNews