एडीआरच्या अहवालात मोठे खुलासे; आंध्रप्रदेशचे चंद्राबाबू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; तर सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचे नाव ऐकून धक्का बसेल!

Written by:Rohit Shinde
Published:
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे. खरंतर यातील नावे ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. आश्चर्य देखील वाटू शकते.
एडीआरच्या अहवालात मोठे खुलासे; आंध्रप्रदेशचे चंद्राबाबू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; तर सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचे नाव ऐकून धक्का बसेल!

आपल्या राज्यातील कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री श्रीमंत, कुणाची किती संपत्ती असे प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असतील. आता तुमच्या याच प्रश्नांचे उत्तर एडीआरच्या अहवालातून समोर आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे. खरंतर यातील नावे ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. आश्चर्य देखील वाटू शकते.

देशातील कोणता मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत?

आजमितीस कोणत्या राज्याचा मु्ख्यमंत्री किती श्रीमंत आहे? त्याच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? तसेच कोणता मुख्यमंत्री गरीब आहे? याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत एकूण 31 मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.  सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री या पदावर आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्रबाबू नायडू कायम आहेत. नायडू यांच्याकडे तब्बल 931 कोटी रुपयांची संपत्ती आहे. चंद्रबाबू नायडू यांच्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्या क्रमांकावर आहेत. खांडू यांच्याकडे एकूण 332 कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील अब्जाधीश मु्ख्यमंत्र्यांचा विचार केला तर नायडू आणि खांडू दोघेच आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या  तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री ममता बॅनर्जी!

देशातील या 31 मुख्यमंत्र्यांच्या एकूण संपत्तीचा विचार केला तर त्यांच्याकडे एकूण 1630 कोटी रुपये आहेत. एडीआर रिपोर्टनुसार ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे फक्त 9 ग्रॅम सोने असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी सोन्याचे भाव 43 हजार 837 रुपये प्रती 10 ग्रॅम होते. विशेष म्हणजे बॅनर्जी यांच्याकडे जमीन देखील नाही. इतकेच नाही तर त्यांच्याकडे स्वतःचे हक्काचे घर देखील नाही अशी माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. पंरतु, त्यांच्या या दाव्यावर भाजपने खोचक टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या परिवाराकडे हरिश मुखर्जी रोडवर 34 नोंदणीकृत संपत्ती आहेत असा दावा भाजपने केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या यादीमध्ये अत्यंत दूर आहेत. म्हणजे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संपत्ती अवघी काही कोटी रूपये आहे. तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संपत्ती देखील काही कोटींच्या घरात होती. परंतू, या अहवालात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या संपत्तीने मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.