पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत, चीनची प्रतिक्रिया, गलवान प्रकरणानंतर पहिल्यांदा मोदी जाणार चीनमध्ये

Written by:Smita Gangurde
Published:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर लादलेल्या टॅरिफमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होत असलेला चीन दौरा महत्त्वाचा मानण्यात येतोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत, चीनची प्रतिक्रिया, गलवान प्रकरणानंतर पहिल्यांदा मोदी जाणार चीनमध्ये

बिजिंग – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तियानजिनमध्ये होणाऱ्या शंघाई सहयोग संघटन शिखर परिषदेत स्वागत आहे, असं चीननं म्हटलय. गलवान खोऱ्यात 2020 साली भारत आणि चीन सैन्यात झालेल्या झटापटीनंतर पहिल्यांदा पंतप्रधान मोदी हे चीनच्या दौऱ्यावर जातायेत.

चीनच्या दौऱ्यापूर्वी 30 ऑगस्टला पंतप्रधान मोदी हे जपानचा दौरा करणार आहेत. भारत जपान सिखर संमेलनात ते सहभागी होणार आहेत. यापूर्वी मोदी 2018 साली जपानमध्ये गेले होते. पंतप्रधान म्ह्णून मोदी यांचा हा सहावा चीनचा दौरा असणार आहे. गेल्या 70 वर्षांत चीनचा दौरा जास्तवेळा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंततप्रधान ठरतील.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक्स पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणाऱ्या शिखर संमेलनात 20 देशांहून अधिक देशांचे नेते आणि 10 आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.

गेल्या महिन्यात एस जयशंकर यांचा चीनचा दौरा

गेल्या महिन्यात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रपती शी जिमनपिंग आणि परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. जलसंसाधनाची माहिती, व्यापार प्रतिबंध, एलएसीवर असलेला तणाव, दहशतवाद आणि कट्टरतावाद्यांविरोधात भूमिका या मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाली होती. जयशंकर यांच्या भेटीत मोदी यांच्या चीन दौऱ्याचा रोड मॅप तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

यापूर्वी रशियात झाली होती जिनपिंग-मोदी भेट

यापूर्वी मोदी आणि जिनपिंग हे दोन्ही नेते ऑक्टोबर 2024 मध्ये रशियात एकमेकांना भेचले होते. कजानमध्ये झालेल्या ब्रिक्स समिटमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. तसचं द्विपक्षीय चर्चाही झाली होती. 50 मिनिटांच्या या भेटीनंतर सीमेवर शांतता आणि स्थिरता राहावी, ही प्राथमिकता असली पाहिजे असं मोदी म्हणाले होते. परस्परातील विश्वास, सन्मान आणि संवेदनशीलता यातून संबंध दृढ राहतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.

टेरिफवाढीच्या धर्तीवर दौऱ्याला महत्त्व

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर लादलेल्या टॅरिफमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होत असलेला चीन दौरा महत्त्वाचा मानण्यात येतोय. रशियाकडून तेल आणि हत्यारं घएतल्यानं नाराज झालेल्या ट्रम्प यांनी भारतावर जास्तीचा आयातकर लादलेला आहे. चीनच्या तुलनेत भारता हा रशियाकडून तेल घेणारा दुसरा मोठा खरेदीदार देश आहे. भारत प्रत्येक दिवशी रशियाकडून 17.8 लाख बॅरल क्रूड ऑईल खरेदी करतो.

 

 

Follow Us :GoogleNews