पुणे जिल्ह्यातील आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत वैभवी रथोत्सव सोहळा संपन्न झाला. हजारो वारकऱ्यांनी राज्यभरातून या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती. त्यामुळे हा सोहळा आणखी दिमाखदार झाला. खरंतर शेकडो वर्षांपूर्वी ज्या आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा मोठा छळ झाला. त्याच आळंदी नगरीत ज्ञानेश्वर माऊलींना लोकांनी, वारकऱ्यांनी डोक्यावर घेतल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत असते.
आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा 729 वा संजीवन समाधी उत्सव संपन्न; लाखो वारकऱ्यांची उपस्थिती
Written by:Rohit Shinde
Published:
आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत वैभवी रथोत्सव सोहळा संपन्न झाला.

लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde →





