Bail Pola 2025 Wishes In Marathi: ‘आला रे आला बैलपोळा’… , प्रियजनांना द्या बैलपोळ्याच्या गोड शुभेच्छा, पाहा सुंदर संदेश

Published:
Last Updated:
बैलपोळ्याला वर्षभर शेतात कष्ट केल्याने आणि साथ दिल्याने बैलांचे आभार मानले जातात.
Bail Pola 2025 Wishes In Marathi: ‘आला रे आला बैलपोळा’… , प्रियजनांना द्या बैलपोळ्याच्या गोड शुभेच्छा, पाहा सुंदर संदेश

Marathi wishes for Bailpola:    महाराष्ट्रात प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. त्यापैकीच एक खास सण म्हणजे पैलपोळा होय. यंदा २२ ऑगस्टला बैलपोळा साजरा केला जात आहे. भारत हा शेतकरी प्रधान देश आहे. त्यामुळे शेतकरी राज्याला शेतात बैलांची मोठी मदत मिळते. म्हणूनच बैल राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो.

 

महाराष्ट्राची खास परंपरा-

महाराष्ट्रात बैलांना विशेष महत्व आहे. त्यामुळे अगदी उत्साहाने ओवाळून, पुरणपोळी करून हा सण साजरा केला जातो. यादिवशी बैलाला सुंदर सजवले जाते. अत्यंत सुंदर असा हा सण आहे. वर्षभर शेतात कष्ट केल्याने आणि साथ दिल्याने त्यांचे आभार मानले जातात. आज बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळेच आपण काही शुभेच्छा संदेश पाहूया….

 

बैलपोळ्याच्या खास शुभेच्छा-

 

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टविना मातीला,
आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय
बैलपोळा निमित्त सर्वांना शुभेच्छा!

उत्सव संस्कृतीचा
सोहळा परंपरेचा, बैलपोळा,
बैलपोळा निमित्त शुभेच्छा!

तुझ्या अपार कष्टाने फुलते सारी भुई,
एक दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई,
शेतकरी बंधूंना
बैलपोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

आला रे आला बैलपोळा,
गाव झालं सारं गोळा,
सर्जा-राजाला घेऊनि जाऊया राऊळा,
बैल पोळा निमित्त सर्वांना शुभेच्छा!

बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा-राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे ऋण,
सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सण आला आनंदाचा,
दिस माझा सर्जा-राजाचा,
ऋण त्याचे माझा माथी,
सण गावच्या मातीचा,
बैलपोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा!

बाकदार पाठीवरती, झूल मखमली बसवा,
गळ्यात घंटनी माळा, पायात घुंगराच्या वाळा,
आज आहे सण पोळा, सर्जा-राजाला ओवाळा,
सर्व शेतकरी बांधवना बैलपोळ्याच्या शुभेच्छा!